पवार साहेबांनी सांगितल्यास दुसऱ्याच क्षणी खासदारकीचा राजीनामा, NCP च्या ‘या’ स्टार ‘कॅम्पेनर’चा ‘आव्वाज’ !

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – इंदापूरमधील जागेवरून राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्यात वाद सुरु आहेत. दोन्ही पक्ष ही जागा आपल्याकडे घेण्याचा प्रयत्न करत आहेत. दरम्यान आज राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य यात्रा नियोजित दौऱ्याप्रमाणे इंदापूरमध्ये आली होती. यावेळी खासदार अमोल कोल्हे यांचे भाषण सुरु असताना राष्ट्रवादीकडून दत्ता भरणे यांना तिकीट द्यावे असा आवाज उठल्याने गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती.

यावेळी अमोल कोल्हे यांनी, मी तिकीट फिक्स करणारा कोणी नाही. मी राष्ट्रवादीचा एक सामान्य कार्यकर्ता आहे. खासदारकीचा, सत्तेचा मला मोह नाही. पवार साहेबांनी खासदारकीचा राजीनामा देण्यास सांगितल्यास दुसऱ्याच क्षणी मी राजीनामा देईन, असे भर सभेत म्हटले आहे. दत्ता मामांचे तिकीट फिक्स की नाही मी सांगणार नाही असे त्यांनी कार्यकर्त्याला उत्तर दिले. तसेच या जागेचा वाद मी सोडवू शकत नसल्याचे कोल्हे यांनी सांगितले.

इंदापूरच्या जागेवरून राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमध्ये जुगलबंदी सुरु आहे. हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या अंकिता पाटील यांना जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीवरून स्वपक्षाकडून डावल्यानंतर आता राष्ट्रवादीकडून हर्षवर्धन पाटलांना आणखी एक धक्का देण्याच्या तयारीत आहे. यावरून राष्ट्रवादी इंदापूरच्या जागेवर ठाम असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळेच आज राष्ट्रवादीची शिवस्वराज्य यात्रा इंदापूरमध्ये आल्यानंतर राजकीय नाट्य पहायला मिळाले.

आरोग्यविषयक वृत्त –