गांधीजींनी आत्महत्या कशी केली ? PM मोदींच्या गुजरातमध्ये 9 वीच्या विद्यार्थ्यांना विचाराला परिक्षेत प्रश्न

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – गुजरातमध्ये गुजराती विषयातील परिक्षेत महात्मा गांधी यांच्यावर विचारण्यात आलेल्या एका प्रश्नावरून वाद निर्माण झाला आहे. सहामाही परिक्षेत नववीच्या पेपरमध्ये महात्मा गांधी यांच्याविषयी प्रश्न विचारण्यात आला होता कि, गांधीजी यांनी आत्महत्या कशाप्रकारे केली. हा प्रश्न चार गुणांसाठी विचारण्यात आला होता.

या प्रश्नावरून वाद सुरु झाल्यानंतर अधिकाऱ्यांनी याचे चौकशीचे आदेश दिले आहेत. त्याचबरोबर बारावीच्या परिक्षेत देखील अशाचप्रकारे विचारण्यात आलेल्या एका प्रश्नामुळे शिक्षण विभागातील अधिकारी देखील हैराण झाले आहेत. यामध्ये तुमच्या विभागात दारूची तस्करी वाढल्यामुळे यासंदर्भात पोलीस अधीक्षकांना पत्र लिहून तक्रार करा, असा प्रश्न देण्यात आला होता. उल्लेखनीय म्हणजे गुजरातमध्ये दारूवर पूर्णपणे बंदी आहे.

गांधीजींनी आत्महत्या कशाप्रकारे केली ?
याविषयी एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, ‘सुफलाम शाला विकास संकुल’ या शाळेतील नववीच्या परीक्षेत हा प्रश्न विचारण्यात आला होता. हि शाळा गुजरातमधील गांधीनगरमध्ये असून या शाळेला गांधीनगर महापालिकेकडून अनुदान मिळते.

शिक्षण विभागाचे चौकशीचे आदेश
गांधीनगरचे जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांनी याविषयी माहिती देताना सांगितले कि, परिक्षेत विचारण्यात आलेल्या प्रश्नावर काही जणांनी आपत्ती दर्शवली असून आम्ही याचा तपास सुरु केला असून अहवाल आल्यानंतर संबंधीतांवर कारवाई करण्यात येईल. सदर शाळेच्या शिक्षण मंडळाने हि प्रश्नपत्रिका तयार केली असून शिक्षण विभागाचा याच्याशी काहीही संबंध नाही.

Visit : policenama.com

बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा…आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या
शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध,अशी घ्या काळजी