शिरूर भुमीअभिलेखच्या कामावर ‘मनसे’कडून प्रश्नचिन्ह, उपाधीक्षकांच्या चौकशीची मागणी

शिक्रापुर : पोलीसनामा ऑनलाईन (सचिन धुमाळ) – शिरुर तालुक्यातील भुमी अभिलेखचे कार्यालयात मोठ्या प्रमाणावर भोगळ कारभार सुरु असून शिरुर भुमीअभिलेख उपाधीक्षक विनायक ठाकरे हे
आपल्या अधिकाराचा गैरवापर करून मनमानी कारभार करत आहेत तर शेतकऱ्यांना देखील वेठीस धरुन आर्थिक हितसंबंध जोपासण्यासाठी पदाचा गैरवापर करत असल्याने त्यांचे तात्काळ निलंबन करुन त्याची विभागीय चौकशी व्हावी अशी मागणी मनसेचे तालुकाध्यक्ष कैलास नरके यांनी वरिष्ठ अधिकांऱ्याकडे केली आहे. या तक्रारी अर्जात काही मुद्दे देखील उपस्थित केले आहे कोरोना सारख्या संकटकाळात कार्यालयात रुग्ण सापडल्याने कार्यालयाबाहेर कार्यालय बंद असल्याचा बोर्ड लावला असतानाही मोजणी अधिकारी माञ मोजणी करतोच कसे. तर सर्वसाधारण मोजणी करताना अतिक्रमणाबाबत सक्षम अधिकार्‍याचा आदेश नसतानादेखील अतिक्रमण काढून हद्द कायम कशा केल्या जातात.

कोरोनामुळे संचारबंदीं असताना देखील मोजणीच्या ठिकाणी २००ते ३०० लोक एकाच वेळी जमले असतानाही मोजणी अधिकारी पोलिस बंदोबस्तात मोजणी करतात कसे.तर अनेक मोजणी प्रकरणे प्रलंबित असतानाही जाणून बुजून आर्थिक देवाणघेवाण करत न्याय प्रविष्ठ असलेल्या प्रकरणाची मोजणी केली जाते. आणि अशा प्रकार वादावादी होत शेतकऱ्यांच्या कुटूंबावर गुन्हे दाखल होतात. अशा प्रकारची अनेक प्रश्न नरके यांनी आपल्या तक्रारीत उपस्थित केले आहे. या अधिकाऱ्यांनी पदाचा गैरवापर करून अवैधरित्या मालमत्ता जमवली आहे, त्यांची एसीबी मार्फत उघड चौकशी करून मालमत्ता जप्त करावी.

या प्रकरणाचा तपास विभागामार्फत करावा. तपास पूर्ण होईपर्यंत भुमीअभिलेख उपाधीक्षक विनायक ठाकरे यांचे तात्काळ निलंबित करावे अशी मागणी मनसेच्या वतीने नरके यांनी आपल्या पञात केली आहे. या बाबतीत शिरुरचे भुमीअभिलेख उपाधिक्षक विनायक ठाकरे यांच्याशी “पोलिसनामा” ने संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की मी शासकीय नियमात राहून काम करत आहे. कोरोना रुग्ण सापडल्याने खबरदारी म्हणून कार्यालय बंद होते पण मोजणीचे काम चालू होते.शिक्रापुर येथे आमच्या सर्वेअरने मोजणी करुन हद्द दाखवून तिथून निघाल्या नंतर पोलिसाबरोबर शेतकऱ्यांचा वाद झाला आणि पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे .