2021 च्या जनगणनेदरम्यान घरातील व्यक्तींच्या संख्येसह विचारले जातील ‘हे’ 23 प्रश्न, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केंद्र सरकारकडून २०२१ मध्ये होणाऱ्या देशाच्या जनगणनेसाठी हालचाली सुरू आहे. दर दहा वर्षांनी होणाऱ्या या जनगणनेदरम्यान देशाच्या लोकसंख्येबरोबरच नागरिकांबाबची विविधा प्रकारची माहितीही गोळा केली जाते. त्यामुळे येणाऱ्या जनगणनेवेळीसुद्धा कुटुंबातील सदस्य संख्येसोबतच इतर महत्त्वाची माहितीदेखील गोळा केली जाणार आहे.

दरम्यान, केंद्रीय मंत्रिमंडळाने २०२१ ची जनगणना आणि एनपीआरच्या अद्ययावतीकरणाला मंजुरी दिली असून या जनगणनेचा अर्ज आणि प्रश्नावली http://www.censusindia.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. यामध्ये संपूर्ण माहिती देण्यात आली आहे.

२०२१ च्या जनगणनेमध्ये विचारण्यात येणारे प्रश्न :
१) घरांची संख्या
२) जनगणना करण्यात येत असलेल्या घराचा घर क्रमांक
३) घराच्या बांधणीसाठी वापरण्यात आलेली सामुग्री ( घराच्या भिंती कच्च्या आहेत की पक्क्या)
४) घराचा पत्ता
५) घरातील कुटुंबांची संख्या
६) घराची मालकी कुणाच्या नावे आहे?
७) कुटुंबप्रमुखाचे नाव
८) कुटुंबांना राहण्यासाठी किती खोल्या आहेत?
९) स्वयंपाकघर, एलपीजी, पीएनजीची जोडणी आहे की नाही?
१०) तुमच्याकडे रेडिओ, ट्रांझिस्टर, मोबाईल, स्मार्टफोन आहेत का?
११) कुटुंबातील सदस्य बँकिंग सेवेचा वापर करतात का?
१२) सांडपाण्याचा निचरा कुठे होतो?
१३) शौचालयाची उपलब्धता?
१४) घरात आंघोळीसाठी सुविधा आहे की नाही?
१५) तुमचा मोबाईल क्रम. फोटो
१६) घरात सायकल, स्कूटर, मोटार सायकल आहे का?
१७) घरात टीव्ही, डिश, फ्री डिश आहे का?
१८) घरात इंटरनेटची जोडणी आहे का?
१९) तुमच्याकडे लॅपटॉप कॉम्प्युटर आहे का?
१०) ऊर्जेचा मुख्य स्त्रोत काय?
२१) घरात कार, जीप, व्हॅन आहे का?
२२) पाण्याचा मुख्य स्त्रोत काय आहे?
२३) स्वयंपाक करण्यासाठी मुख्यत्वेकरून कुठल्या इंधनाचा वापर करता.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/