प्रश्न विचारणाऱ्यांना देशद्रोही ठरवले जातेयः स्वामी अग्निवेश

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

माणूस असला की बुद्धी, विवेक असणार. चर्चेतून तर खरा धर्म समोर येतो. प्रश्न-उत्तर परंपरा बंद केली आहे. प्रश्न विचारले तर देशद्रोही ठरवले जात आहे. माझ्यावर हल्ला केला. मी जर देशद्रोही असतो तर सरकारने मला पकडले असते. मी इतका भयानक असतो तर मला जेलमध्ये टाकले असते. इंग्रजांनी सुरू केलेली पद्धत अवलंबून तुम्ही इथल्याच लोकांना देशद्रोही ठरवत आहात, अशा शब्दांत त्यांनी केंद्र सरकारवर हल्ला चढवला. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्यावतीने ‘धार्मिक दहशतवाद व असहिष्णुता विरोधी राज्यस्तरीय संकल्प परिषद’ आयोजित करण्यात आली. या परिषदेत ज्येष्ठ विचारवंत व सामाजिक कार्यकर्ते स्वामी अग्निवेश आज पुण्यात बोलत होते.
[amazon_link asins=’B0756Z43QS’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’c1f7d2fb-b41f-11e8-a457-2ba6bdaf195e’]

देशात दहशतवादाचे वातावरण आहे. आपल्याला केवळ दहशतवाद म्हणजे आयसिस वगैरे वाटायचे, पण देशात नवीन दहशतवाद निर्माण झाला आहे. लोकांमध्ये भयाचे वातावरण आहे. ज्यांना सत्ता दिली तेच लोकांमध्ये द्वेष निर्माण करत आहेत. सरकारच्या धोरणाची चिकित्सा करणे हा देशद्रोह कसा?, असा सवाल करून प्रश्न विचारणाऱ्यांना देशद्रोही ठरवले जात असल्याचा गंभीर आरोप स्वामी अग्निवेश यांनी केला.

धर्माला देवाशी जोडले जात आहे. प्रश्न विचारायचे नाही. अंधश्रद्धा ठासून भरली जात आहे. मी हे सगळे भोगले आहे. धर्माचे मूल्य कळले नसते तर मी ही जातीयवादी व धर्मांध बनलो असतो. दाभोलकरांनी कुणाचे काय बिघडवले होते? दाभोलकरांसोबत काही आक्षेप होता तर त्यांच्याशी संवाद साधायचा होता. तुम्ही तर त्यांची थेट हत्या करून टाकली. शंकराचार्य देखील चर्चा करायचे. एवढी मोठी परंपरा कुठे गेली?, असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.
[amazon_link asins=’B0756Z53JN’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=”]

‘हम भारत के लोग है’, संविधान हा धर्म आहे. तुम्ही संविधानाला जात, धर्म यामध्ये अडकून ठेवले आहे. धर्मांध वातावरणामुळे लोक वेगळे होत आहेत. लोकांची फाळणी करणाऱ्या धर्माला आपण कसे स्वीकारायचे?, असेही ते म्हणाले. विरोधक एकत्र आले नाहीत तर सत्ताधारी एकेकाला संपवतील, असे सांगत विरोधकांना एकत्र येण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपला १५० पेक्षा अधिक जागा मिळणार नाहीत त्यामुळे खऱ्या अर्थाने पुढच्या वर्षी अच्छे दिन येतील, असे भाकीतही त्यांनी केले.

Please Subscribe Us On You Tube