बाळासाहेब ठाकरेंच्या अटकेबाबत छगन भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट, म्हणाले…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये बाळासाहेब ठाकरे यांच्या अटकेबाबत खुलासा केला होता. वरिष्ठांच्या हट्टापायी बाळासाहेब ठाकरेंना अटक करण्यात आल्याचं अजित पवार यांनी सांगितले. अजित पवारांचा इशारा छगन भुजबळांवर होता का, असा प्रश्न छगन भुजबळांना विचारला असता, त्यांनी माझा नाईलाज होता, म्हणून मी त्या फाईलवर सही केल्याचे भुजबळांनी म्हटले आहे.

बाळासाहेब ठाकरेंना अटक ही राष्ट्रवादीची चूक होती. त्या काळामध्ये आमचंही स्वत:चं मत होतं. इतक्या टोकाच राजकारण कोणी करू नये, त्यावेळी आमच्या मताला एवढी किंमत नव्हती. काही वरिष्ठांच्या हट्टापायी तसं करण्यात आलं, असे अजित पवार यांनी सांगितले होते. त्यावर राष्ट्रवादीचे नेते आणि तत्कालीन गृहमंत्री छगन भुजबळ यांनी उत्तर देताना, आता तो विषय संपला असल्याचे म्हटले आहे. दरम्यान अजित पवार यांच्या या वक्तव्यानंतर शिवसेनेने जाहीर माफी मागावी अशी मागणी केली आहे.

अजित पवारांच्या वक्तव्यानंतर छगन भुजबळ यांनी स्पष्टीकरण दिले आहे. 1999 मध्ये ज्यावेळी आम्ही पक्षाच्या प्रचारासाठी उतरलो, त्यावेळी आमच्या वचननाम्यातच श्रीकृष्ण आयोगाने ज्या व्यक्तींना दोषी ठरवले आहे त्यांच्यावर कारवाई करु असं होतं. 1995 मध्ये युतीचे सरकार आल्यानंतर बाळासाहेब ठाकरे आणि शिवसैनिकांविरुद्ध असलेल्या खटल्यांचा निपटारा करण्यात आला होता. मात्र, श्रीकृष्ण आयोगाची फाईल तशीच होती. ज्यावेळी ती फाईल माझ्यासमोर आली तेव्हा मी गृहमंत्री होतो. तेव्हा माझी अवस्था इकडे आड आणि तिकडे विहीर अशी झाली होती. त्यामुळे मला नाईलाजाने त्या फाईलवर सही करावी लागली होती. मात्र, आता हा मुद्दा संपला असल्याचे त्यांनी सांगितले.

Visit : policenama.com
बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा…आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या
शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध,अशी घ्या काळजी