Video : अंड खराब आहे की ताजं हे ओळखण्याची सोपी घरगुती पद्धत ! जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   अनेकांना बाजारातून आणलेली अंडी ही खराब आहेत चांगली आहेत हे ओळखता येत नाही. आता MyGovIndia च्या ट्विटर अकाऊंटवरून अंडी चांगली आहेत की, नाही हे ओळखण्याची सोपी पद्धत सांग्ण्यात आली आहे. आज याचबद्दल आपण माहिती घेणार आहोत.

MyGovIndia च्या ट्विटरवरून याचं एक व्हिडीओ देखील शेअर करण्यात आलं आहे. एक पाण्यानं भरलेला ग्लास घ्या. एक अंड घ्या आणि अलगत त्यात सोडा. ग्लास हा काचेचा असावा म्हणजे परिक्षण करणं सोपं होईल. जर अंड ताजं असेल ते ग्लासाच्या तळाशी जाऊन बसेल आणि ते आडवंही दिसेल उभं दिसणार नाही. परंतु जर ते अंड खराब झालं असेल तर ते ग्लासाच्या तळाशी न जाता पाण्यावर तरंगेल किंवा ते उभं राहिल..

जर तुम्ही खराब अंड्याचं सेवन केलं तर साल्मोनेला संसर्ग होण्याची शक्यता असते. साल्मोनेला हा एक प्रकरचा विषाणू आहे. ज्यामुळं विषबाधा होऊन अतिसार, उलट्या आणि पोटात चमक भरणं अशा तक्रारी उद्भवू शकतात.