भामट्यांच्या जाळ्यात अडकलेल्या Paytm धारकांना ‘तात्काळ’ सपोर्ट, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पेटीएम केवायसीच्या नावाखाली फसवणूकीचे प्रकार वाढत आहेत. तशा तक्रारी ग्राहकांकडून होत आहेत. मुंबई पोलिसांनी त्यावर उपाययोजना म्हणून ‘अर्जंट फ्रॉट’ (पेटीएम) नावाचा ग्रुप बनवला आहे. या ग्रुपमध्ये यूपीआय हेड, पेटीएम सायबर सेल, मुंबईसह राज्यातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांचा समावेश आहे. ठगांच्या जाळ्यात अडकलेल्या व्यक्तीने तासाभरात पोलिसांशी संपर्क साधताच या अ‍ॅपद्वारे त्यांचे पैसे वाचविण्यास मदत होत आहे.

गुरुवारी मला मदत करा असे सांगत अंधेरीच्या प्रियांशू इंजिनिअर या व्यावसायिक तरुणाने आपल्या वडिलांसोबत घाटकोपर पोलीस ठाण्यातील सायबर सेल गाठले. त्याला केवायसी संबंधित संदेश आला होता, ज्यात केवायसी न केल्याने पेटीएम पुढल्या 24 तासात बंद होईल, केवायसीसाठी खाली नमूद क्रमांकावर संपर्क साधा. यालाच प्रियांशु भुलला आणि त्यांनी खातरजमा न करता संदेशावर नमूद क्रमांकावर संपर्क साधला. समोरील व्यक्तीने त्याला क्विक सपोर्ट अ‍ॅप डाऊनलोड करण्यास सांगितले. ते डाऊनलोड होताच प्रियांशूचे बँक खाते रिकामे होऊ लागले. सायबर सेलमध्ये कार्यरत असलेल्या पोलीस अंमलदार संतोष गीध यांनी या तरुणांची चौकशी करत बसण्यापेक्षा त्याचा तपशील तात्काळ अर्जंट फ्रॉड (पेटीएम) या ग्रुपवर फॉरवर्ड केला. काही क्षणातच त्यांच्या खात्यालील 20 हजार रुपये वाचले.

एका पोलीस ठाण्यात सरासरी अशा प्रकारच्या 6 ते 7 तक्रारी येत आहेत. गीध यांनी माहिती दिली की, फसवणूक करणारे केवायसीच्या नावाखाली क्विक सपोर्ट अ‍ॅप किंवा अ‍ॅमी अ‍ॅडमिन नावाचे अ‍ॅप डाऊनलोड करण्यास सांगतात. अ‍ॅप मोबाइलमध्ये डाऊनलोड करताच तुमच्या मोबाइलचे नियंत्रण समोरील व्यक्तीकडे जाते. त्याद्वारे तुमच्या पेटीएम खात्यातील तपशील चोरुन फसवणूक करणारी मंडळी परस्पर वळवतात. त्यामुळे नागरिकांनी वेळीच सतर्क होत अशा टोळ्यापासून सावध होणे आवश्यक आहे. आपली गोपनीय माहिती कोणाशी शेअर करु नये तसेच क्विक सपोर्ट अ‍ॅप किंवा अ‍ॅमी अ‍ॅडमिन यासारख्या अ‍ॅपद्वारे फसवणूक होते हे लक्षात घ्यावे.

बँकांचा निष्काळजीपणा –
बँकांच्या निष्काळजीपणामुळे हे गुन्हे वाढत असल्याचे सायबर पोलिसांच्या निरिक्षणातून समोर येत आहे. कुठलीही खातरजमा न करता बनावट कागद पत्रांच्या आधारे खाते उघडण्यात येत आहे. केवायसीबाबत ढिसाळपणा समोर येत आहे असे सायबर पोलिसांकडून सांगण्यात आले.

अर्जंट फ्रॉड –
अर्जंट फ्रॉड असे या ग्रुपचे नाव आहे. हा 20 एप्रिल 2018 साली सुरु करण्यात आला. या ग्रुपमध्ये यूपीआय हेड सह पेटीएम सायबर सेलचे पदाधिकारी आहेत. मुंबईसह राज्यातील अनेक पोलिसांचा या ग्रुपमध्ये समावेश आहे. या ठगांच्या जाळ्यात अडकलेल्या पेटीएमधारकांचा ट्रान्झेक्शन आयडी आणि डेबिट कार्डचे पाहिले 6 आणि शेवटचे 4 अंक टाकण्यात येतात. त्यानुसार पैसे कोणत्या खात्यात वळण्यात आले याची माहिती मिळते.

– त्यानंतर पेटीएममध्ये पैसे असल्याचे कळताच ते तात्काळ ब्लॉक करण्यात येते. ते एखाद्या अन्य खात्यात वळवल्याचे लक्षात येतात संबंधित बँकेला डेबिट फ्रिज करण्याचा मेल पाठवण्यात येतो. जेणेकरुन फ्रॉड करणारी व्यक्ती पैसे काढू शकणार नाही.

– पोलिसांच्या कारवाईतून समोर आले की कॉल नॉएडातून, पैसे पश्चिम बंगालच्या खात्यात जमा होत असल्याचे प्रमाण जास्त आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/