‘या’ 5 कारणांमुळे अ‍ॅड्रॉइड स्मार्टफोन होतो स्लो चार्ज, तुम्ही सुद्धा ‘या’ चूका करत नाही ना ?, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन – अँड्रॉइड स्मार्टफोन येण्यापूर्वी मोबाइल फोन केवळ कॉल करणे किंवा मॅसेज करण्यापर्यंत मर्यादित होता. परंतु आता लोक स्मार्टफोनचा वापर जास्त करू लागले आहेत. नव्या टेक्नॉलॉजीचे स्मार्टफोन बाजारात आले आहेत, जे फास्ट चार्जिंग होतात. परंतु अनेक लोक स्मार्टफोन स्लो चार्ज होण्याच्या समस्येने त्रस्त असतात. यापाठीमागे अनेक कारणे आहेत, ज्याकडे लक्ष दिले जात नाही. जर तुमचा स्मार्टफोनसुद्धा स्लो चार्ज होत असेल तर आम्ही काही टिप्स सांगणार आहेत, ज्यांच्या मदतीने तुम्ही सुद्धा आपला स्मार्टफोन फास्ट चार्ज करू शकता.

1. ओरिजनल चार्जरचा करा वापर
स्मार्टफोन चार्ज करताना नेहमी ओरिजिनल चार्जरचा वापर करा, मार्केटमध्ये मिळणारे नकली आणि स्वस्त चार्जर वापरू नका, असे केल्याने स्मार्टफोनचा स्फोट होण्याचा धोका वाढतो आणि तो खराबही होऊ शकतो.

2. बॅक कव्हर काढून करा चार्ज
बॅक-कव्हर लावून फोन चार्ज केल्याने हिट बाहेर पडत नाही. कव्हर वापरल्याने हिट ट्रॅप होते, यामुळे फ़ोन गरम होऊन बॅटरीची एफीसिएन्सी कमी होते. जर कव्हर काढून जार्चिंग केले तर लवकर होते.

3. बनावट डाटा केबलचा वापर टाळा
नकली डाटा केबल वापरू नका. तसेच चार्जर सुद्धा ओरिजनल वापरा. नकली डाटा केबल वापरल्याने फोन स्लो चार्ज होतो, शिवाय फोन खराब सुद्धा होतो.

4. या मोड्सचा करा वापर
स्मार्टफोनला नेहमी पावर सेव्हिंग मोड किंवा बॅटरी सेव्हर मोडवरच चार्ज करा. असे केल्याने स्मार्टफोनचे एक्स्ट्रा बॅकराऊंड अ‍ॅप्स बंद होतील आणि स्मार्टफोन लवकर चार्ज होईल.

5. फोन स्विच ऑफ करून चार्ज करा
फोन स्विच ऑफ करून चार्ज करू शकता, असे केल्याने तो लवकर चार्ज होतो, कारण नेटवर्क सिग्नल बंद होतात आणि अनेक अ‍ॅपसुद्धा बंद झाल्याने बॅटरी लवकर चार्ज होते.