R Ashwin | आर. अश्विननं लागोपाठ 5 व्या सामन्यात केला ‘हा’ मोठा कारनामा

रांची : वृत्तसंस्था – आर.अश्विनने (R Ashwin) टी-20 आंतरराष्ट्रीयमध्ये जोरदार कमबॅक करत फक्त स्वत:लाच सिद्ध केलं नाही, तर विराट कोहलीची (Virat Kohli) चूकही दाखवून दिली आहे. आर.अश्विनने (R Ashwin) न्यूझीलंडविरुद्धच्या (New Zealand) पहिल्या टी-20 मध्ये 4 ओव्हरमध्ये 23 रन देत 2 विकेट घेतल्या होत्या तर दुसऱ्या टी-20 मध्ये 4 ओव्हरमध्ये 19 रन देऊन 1 विकेट घेतली. विराट कोहलीच्या नेतृत्वात अश्विनला (R Ashwin) टी-20 क्रिकेट खेळण्याची कमी संधी मिळाली. जुलै 2017 पासून तो टीम इंडियाच्या बाहेर होता. आर अश्विनला टी-20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup) चार वर्षानंतर टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कमबॅक करण्याची संधी मिळाली.

 

विराट कोहलीने टी-20 वर्ल्ड कपमध्ये अश्विनला (R Ashwin) पाकिस्तान (Pakistan) आणि न्यूझीलंडविरुद्धच्या मॅचमध्ये मैदानात उतरवलं नाही, या दोन्ही सामन्यांमध्ये टीम इंडियाचा पराभव झाला, पण अश्विनच्या पुनरागमनानंतर भारताने सगळे सामने जिंकले आणि या सगळ्या सामन्यांमध्ये अश्विनची कामगिरी उल्लेखनीय झाली होती. अश्विनने अफगाणिस्तानविरुद्ध (Afghanistan) 14 रन देऊन 2 विकेट, स्कॉटलंडविरुद्ध (Scotland) 29 रन देऊन 1 विकेट आणि नामिबियाविरुद्ध (Namibia) 20 रन देऊन 3 विकेट मिळवल्या होत्या. अश्विन कमबॅक केल्यानंतर 5 मॅचमध्ये 9 विकेट घेतल्या आहेत. यादरम्यान अश्विनचा इकोनॉमी रेटही 6 पेक्षाही कमी आहे. आंतरराष्ट्रीय करियरमध्ये अश्विन लागोपाठ दुसऱ्यांदा 5 टी-20 सामन्यांमध्ये विकेट घेण्यात यशस्वी ठरला आहे.

 

 

अश्विनने आपल्या कारकिर्दीत टी-20 क्रिकेटच्या 262 इनिंगमध्ये 264 विकेट घेतल्या,
यात त्याने 6.92 च्या इकोनॉमी रेटने बॉलिंग केली. यामध्ये त्याने 4 वेळा 4 विकेट घ्यायचा विक्रमही अश्विनने केला.
8 रन देऊन 4 विकेट हि त्याची आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी आहे.
आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये अश्विनने 51 मॅच खेळून 61 विकेट पटकवाल्या.
यामध्ये त्याचा इकोनॉमी रेट 6.80 आहे. आर.अश्विनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या इतर दोन्ही फॉरमॅटमध्येही स्वत:ला सिद्ध केलं आहे. 79 टेस्टमध्ये 25 च्या सरासरीने त्याने 413 विकेट मिळवल्या आहेत.
यामध्ये 30 वेळा त्याला 5 विकेट आणि 7 वेळा मॅचमध्ये 10 विकेट मिळाल्या.
59 रन देऊन 7 विकेट हि त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. याशिवाय 111 वनडेमध्ये त्याने 150 विकेट घेतल्या आहेत.

 

Web Title :- R Ashwin | ind vs nz r ashwin shines after come back in t20 international virat kohli makes mistake

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा