R Ashwin | आर. अश्विन लवकरच मोडणार हरभजन-कुंबळेचा ‘रेकॉर्ड’

नवी दिल्ली : वरृतसंस्था – आर.अश्विन (R Ashwin) टेस्ट क्रिकेटमधला बऱ्याच काळापासून भारताचा सर्वोत्तम बॉलर आहे. जून महिन्यात न्यूझीलंडविरुद्ध वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची (World Test Championship) फायनल खेळल्यानंतर आता अश्विन पुन्हा एकदा टेस्ट खेळण्यासाठी न्यूझीलंडविरुद्ध मैदानात उतरणार आहे. आर.अश्विन (R Ashwin) ने आपल्या फिरकीच्या तालावर गेल्या काही वर्षांमध्ये न्यूझीलंडला (New Zealand) बराच त्रास दिला आहे. टेस्टमध्ये अश्विनच्या नावावर न्यूझीलंडविरुद्ध 52 विकेट आहेत. यावरून दिसते कि अश्विन न्यूझीलंडविरुद्ध किती यशस्वी बॉलर आहे.

 

आर.अश्विनने नुकत्याच झालेल्या टी-20 वर्ल्ड कप आणि भारत न्यूझीलंड टी-20 सीरिजमधून सगळ्यात छोट्या फॉरमॅटमध्ये चार वर्षांनी पदार्पण केलं. यानंतर आता तो 25 नोव्हेंबरपासून कानपूरमध्ये (Kanpur) सुरू होणाऱ्या पहिल्या टेस्टमध्ये दिसणार आहे. या सामन्यात अश्विनला (R Ashwin) अनेक रेकॉर्ड आपल्या नावावर करून घेण्याची संधी आहे.

 

1) अश्विनने टेस्टमध्ये केन विलियसमनला (Kane Williamson) 5 वेळा आऊट केलं आहे, याबाबत त्याने भारताचा माजी स्पिनर प्रग्यान ओझाची (Pragyan Ojha) बरोबरी केली आहे. या सीरिजमध्ये अश्विनने विलियसमनची एकदा विकेट घेतली तर तो ओझाच्या पुढे जाईल आणि किवी कर्णधाराला सर्वाधिक वेळा आऊट करण्याचा विक्रम अश्विनच्या नावावर होईल.

 

2) अश्विनने 7 वेळा मॅचमध्ये 10 विकेट घेतल्या आहेत. भारताकडून टेस्ट क्रिकेटमधली ही दुसरी सर्वोत्तम कामगिरी आहे. या यादीत अनिल कुंबळे (Anil Kumble) पहिल्या क्रमांकावर आहे. अनिल कुंबळेने आतापर्यंत 8 वेळा सामन्यात 10 विकेट घेतल्या आहेत. अनिल कुंबळेच्या या विक्रमाची बरोबरी करण्यासाठी अश्विनला आणखी एकदा 10 विकेट घेण्याची गरज आहे.

 

3) अश्विनने टेस्ट क्रिकेटमध्ये 79 सामने खेळून 24.56 च्या सरासरीने 413 विकेट घेतल्या.
हरभजन सिंगचं (Harbhajan Singh) 417 विकेटचं रेकॉर्ड मोडण्यासाठी अश्विनला आणखी 5 विकेटची गरज आहे.
भारताकडून सर्वाधिक टेस्ट विकेट घेणाऱ्या खेळाडूंमध्ये अनिल कुंबळे 619 विकेटसह
पहिल्या क्रमांकावर आणि कपिल देव (Kapil Dev) 434 विकेटसह दुसऱ्या क्रमांकावर आहेत.

 

भारत-न्यूझीलंड यांच्यातल्या 2 टेस्ट मॅचच्या सीरिजला 25 नोव्हेंबरपासून कानपूरमध्ये सुरुवात होणार आहे.
पहिल्या टेस्टसाठी अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) टीमचा कर्णधार असणार आहे.
तर दुसऱ्या टेस्टमध्ये विराट कोहली (Virat Kohli) टीमचा कर्णधार असणार आहे.
पहिल्या टेस्टमध्ये रहाणे अश्विनशिवाय रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja),
अक्षर पटेल (Axar Patel) आणि जयंत यादव (Jayant Yadav) यांच्यापैकी कोणाला संधी देतो ते पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

 

Web Title :- R Ashwin | india vs new zealand test series ravichandran ashwin can reach 3 milestones equals anil kumble record

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा