R Ashwin Surpasses Legendary Kapil Dev | व्वा आश्विन व्वा ! आश्विनने मोडला कपिल देवचा विक्रम, सर्वाधिक बळींच्या यादीत मारली भरारी !

पोलीसनामा ऑनलाईन टीम – R Ashwin Surpasses Legendary Kapil Dev | भारत आणि श्रीलंकेमधील (IND vs SL) दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारताने आघाडी मिळवली आहे. फॉलो ऑन (Follow on) दिलेला श्रीलंका संघ दुसऱ्या डावातही ढेपाळला. भारतीय स्पीनर्सने (Indian Spinners) कमाल केली. यामध्ये फिरकीपटू आर. आश्विनने माजी कर्णधार कपिल देव यांचा विक्रम मोडला आहे. भारताना ही कसोटी एक डाव आणि 222 धावांनी जिंकली. (R Ashwin Surpasses Legendary Kapil Dev)

 

भारताने दिलेल्या 574 धावांचा पाठलाग करताना श्रीलंका संघ (Sri Lanka Team) पहिल्या डावात 174 धावांवर आटोपला. त्यानंतर कर्णधार रोहित शर्माने (Captain Rohit Sharma) श्रीलंकेच्या संघाला फॉलो ऑन दिले. मात्र दुसऱ्या डावातही श्रीलंकान संघाला चमकदार कामगिरी करता आली नाही. दुसऱ्या डावात आश्विनने (R. Ashwin) श्रीलंकेच्या चार फलंदाजांना तंबूचा मार्ग दाखवत त्याने कसोटीमधील मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे.

 

भारतात कसोटीमध्ये सर्वाधिक बळी (Most wickets Test) मिळवण्याच्या यादीत त्याने कपिल देव यांना मागे टाकत 435 बळी घेतले आहेत. भारतात सर्वाधिक बळी घेण्याच्या यादीमध्ये अनिल कुंबळे (Anil Kumble) प्रथम स्थानी आहेत. त्यांनी 132 कसोटी सामने खेळत 619 बळी घेतले आता त्या खालोखाल 435 बळी घेत आश्विनने दुसरा क्रमांक पटकावला आहे. त्यानंतर कपिल देव (Kapil Dev) 131 सामन्यात 434 बळींसह तिसऱ्या स्थानावर आहेत.

विशेष म्हणजे आश्विनने अवघ्या 85 कसोटी सामन्यांमध्ये ही कामगिरी केली आहे.
जगात सर्वाधिक कसोटी बळी घेण्याच्या यादीत श्रीलंकेचा मुरलीधरन (Muttiah Muralitharan) 800 विकेट्ससह अग्रस्थानी आहे.
त्यानंतर शेन वार्न (Shane Warne) 708 बळींसह दुसऱ्या स्थानावर तर तिसऱ्या स्थानावर 640 बळींसह जेम्स एंडरसन आहे.
भारताचे अनिल कुंबळे 619 बळींसह चौथ्या स्थानावर आहेत.

 

Web Title :- R Ashwin Surpasses Legendary Kapil Dev | r ashwin equals kapil devs test record breaks into top 10 highest wicket takers list

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

PM Modi Visit To Pune | Pune Metro चे PM मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; नरेंद्र मोदी म्हणाले – ‘पुण्याच्या विकास प्रकल्पासाठी केंद्र सरकार सहकार्य करणार’

 

PM Modi Visit To Pune | पुणे मेट्रोचं उद्घाटन करताना पंतप्रधान मोदींचा काँग्रेस-राष्ट्रवादीला आपल्या खास शैलीत टोला, म्हणाले…

 

Former MLA Mohan Joshi | छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राजमुद्रेचा अवमान रोखण्यास काँग्रेसला यश ! सत्ताधारी भाजपच्या मनमानीला दणका – माजी आमदार मोहन जोशी