बोर्डाच्या निकालानंतर अभिनेता आर माधवनची विद्यार्थ्यांसाठी खास पोस्ट ! बोर्डात मिळालेत ‘एवढे’ गुण

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  काही दिवसांपूर्वीच दहावीचा CBSE चा निकाल लागला. यानंतर 16 जुलै रोजी 12 वीचा निकाल जाहीर झाला. याच पार्श्वभूमीवर अभिनेता आर माधवन एक पोस्ट शेअर केली आहे आणि विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवण्याचा प्रयत्न केला आहे. याशिवाय त्यानं त्याचे बोर्ड परीक्षेतील मार्क्सही सांगितले आहेत. विद्यार्थ्यांना त्यानं खास सल्लाही दिला आहे.

आर माधवन यानं ट्विटरवर त्याचा एक फनी फोटो शेअर केला आहे. या ट्विटमध्ये माधवन लिहितो, “ज्यांनी बोर्डाच्या परीक्षेत अपेक्षित यश मिळवलं आहे त्यांचं अभिनंदन. बाकी लोकांना मी एवढंच सांगू इच्छितो की, मला बोर्डाच्या परीक्षेत केवळ 58 टक्के मिळाले आहेत. मित्रांनो अजून खरा खेळ सुरू झालाच नाहीये.”

आर माधवन यानं या पोस्टमध्ये काही फनी इमोजीचा वापर केला आहे. आर माधवनची ही पोस्ट नक्कीच विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारी आहे. सध्या माधवनची ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

माधवनच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर लवकरच तो राकेट्री : द नांबी इफेक्ट या सिनेमात काम करताना दिसणार आहे. इस्रोचे माजी वैज्ञानिक नांबी नारायण यांच्या जीवनावर आधारीत हा सिनेमा आहे.