आता आर.माधवन करणार ‘या’ चित्रपटाचे डायरेक्शन

मुंबई : वृत्तसंस्था- ‘रहना है तेरे दिल मै’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या आर. माधवन याने बॉलिवूडमध्ये अनेक हिट चित्रपटात काम केले आहे. आता लवकरच आर. माधवन याचा ‘रॉकेट्री : द नंबी इफेक्ट’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे डायरेक्शन माधवन करणार असल्याचे समजते आहे. हा चित्रपट भारतीय अवकाश संशोधन संस्थेतील (इस्रो) येथील भूतपूर्व शास्त्रज्ञ एस.नंबी नारायण यांच्या जीवनावर आधारित असणार आहे.

प्रथम  या चित्रपटाचे डायरेक्शन अनंत महादेवन करत होते परंतु इतर कमिटमेंटमुळे त्यांना हा प्रोजेक्ट सोडावा लागला. एका इंग्रजी वृत्तानुसार आर. माधवनने सांगितले की, अनंत महादेवन एक चांगले दिग्दर्शक आहे. पण इतर कामांमुळे त्यांना हचित्रपट सोडावा लागला. हा चित्रपट विविध कारणांमुळे माझ्या खूप जवळचा आहे. नंबी नारायणन यांची कथा संपूर्ण जगाला सांगण्यासाठी मी खूप उत्सुक आहे.

यासंबंधी माधवनने  सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. या फोटो मध्ये एक पाटी आहे ज्यामध्ये डायरेक्टर म्हणून माधवनचे नाव दिसत आहे. या खाली तुमचा आशीर्वाद आणि प्रेमाची गरज असल्याचे  त्याने म्हटले आहे.

नंबी नारायणन हे इस्रोमधील एक शास्त्रज्ञ असून त्यांना १९९४मध्ये हेरगिरी प्रकरणात त्यांना अटक करण्यात आली होती. नंबी नारायणन यांनी भारताच्या अंतराळ कार्यक्रमाबाबतचा गोपनीय दस्तऐवज परकीयांच्या स्वाधीन केल्याचे आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता.हा चित्रपट तमीळ, तेलगू, हिंदी व इंग्रजी भाषेत प्रदर्शित होणार आहे.