आर.आर. आबांचा पुतळा नव्या पिढीला प्रेरणा देईल !

सांगली : पोलीसनामा ऑनलाईन – स्वर्गीय आर. आर. आबा या हिमालयाच्या उंचीच्या माणसाचं कर्तृत्व न मोजता येणारं आहे. आबांच्या जाण्याचे दु:ख अं:तकरणात कायम राहिल. मात्र त्यांचा पुतळा येणाऱ्या नव्या पिढीला प्रेरणा देईल. त्यांचा सुपुत्र रोहित पाटीलच्या रुपाने राज्याला येणार्‍या काळात कर्तृत्वान पिढी पहायला मिळेल, असे मत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले.
R-R-Patil-Statue
तासगाव येथे बाजार समितीच्या आवारात माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांच्या पुतळ्याचे पवार यांच्या हस्ते अनावरण झाले. अध्यक्षस्थानी खासदार अमोल कोल्हे होते. यावेळी पवार बोलत होते. पवार म्हणाले, आबांच्या आदर्शाची नव्या पिढीला प्रेरणा देण्याचे काम हा पुतळा करेल. आबा आणि सामान्य माणसाचं एक वेगळं नाते होते. त्यांनी स्वच्छ चारित्र्याचा आदर्श निर्माण करून काम केले. एका विचाराने राज्यात तरुणांना कॅबीनेट मंत्रीपदावर काम करण्याची संधी दिली होती. आबांची ग्रामीण भागाशी नाळ होती. ग्रामविकासमंत्री पदाच्या माध्यमातून झालेल्या अनेक कामांची दखल देशपातळीवर घेतली गेली.
माझ्यापेक्षा 20 वर्षांनी आबा लहान होते. हे त्यांचे जाण्याचे वय नव्हते. त्यांचे कर्तृत्व बहरण्याचा कालावधी होता. आबांच्या जाण्याचे दु:ख अंतकरणात कायम राहिल. मात्र पुढच्या पिढीत पुन्हा एकदा संपुर्ण राज्याला रोहितच्या रुपाने आबा पहायला मिळतील. आबांच्या कुटुुंबाला इथुन पुढे हेच प्रेम द्या, या प्रेमातून राज्याला कर्तृत्वान नवी पिढी पहायला मिळणार असल्याचे पवार यांनी सांगितले.

खासदार अमोल कोल्हे म्हणाले, कोणतीही राजकीय पार्श्‍वभुमी नसताना, राजकारणात कर्तृत्वाच्या जोरावर स्वत:चा ठसा उमटवण्याचा आदर्श आबांनी निर्माण केला होता. माझ्यासारख्या कोणतीही राजकीय पार्श्‍वभुमी नसताना, राजकारणात येणार्‍यांना जो आदर्श असतो, तो म्हणजे आर. आर. पाटील. शिवस्वराज्य यात्रेला महाराष्ट्रभर फिरताना एकही जिल्हा असा नव्हता जिथे आबांचे नाव निघाले नाही.

प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील म्हणाले, राष्ट्रवादीत आबांचे स्थान महाराष्ट्रव्यापी होते. आबांची उणीव राज्यात जाणवतेच. त्याहीपेक्षा राष्ट्रवादीला जाणवते. आबा असते तर आजचं चित्र वेगळं दिसले असते. 2024 ला या मतदारसंघात रोहित पाटीलच राष्ट्रवादीचे आमदार असतील, अशी ग्वाही यावेळी जयंत पाटील यांनी दिली.

यावेळी शिवसेनेचे आमदार अनिल बाबर, अनिता सगरे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी आमदार सुमनताई पाटील, आमदार मोहनराव कदम, माजी आमदार सदाशिव पाटील, उमाजीराव सनमडीकर, गोपीचंद पडळकर, जिल्हा बँकेचे अध्यक्ष दिलीप पाटील, जिल्हा बॅंकेचे संचालक सुरेश पाटील यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
R-R-Patil
गोपीचंद आमच्या प्रत्येक स्टेजवर या : आ. विश्‍वजीत कदम
आमदार विश्‍वजीत कदम यांचे भाषण सुरु असतानाच, वंचितचे नेते गोपीचंद पडळकर यांचे आगमन झाले. यावेळी आमचे मित्र गोपीचंद या स्टेजवर आमच्यासोबत आले आहेत, यापुढेही त्यांनी प्रत्येक स्टेजवर आमच्यासोबत रहावे, असे सुचक वक्तव्य केले. तर पतंगराव कदम साहेबांप्रमाणेच, येणार्‍या काळात रोहित पाटील यांचा मोठा भाऊ म्हणुन आबांच्या कुटुंबासोबत कायम राहू अशी ग्वाही यावेळी आमदार कदम यांनी दिली.

चिंचणीच्या हनुमानाचा आशिर्वाद
रोहीत पाटील मनोगत व्यक्त करत असताना म्हणाले, आजपर्यंत आबांना तासगावच्या गणपतीचा, सिध्देश्‍वराचा, आरेवाडीच्या बिरोबाचा, कवठेमहाकाळच्या महांकाली देवीचा आशिर्वाद मिळाला होता. या निवडणुकीत चिंचणीच्या हनुमानाचा आशिर्वाद घ्यायचा आहे. अविकाका हा आशिर्वाद मिळवून देतीलच, असे रोहित पाटील यांनी म्हणताच, कार्यकर्त्यांनी जयघोष केला.

आरोग्यविषयक वृत्त –