‘रेस 3’चा अ‍ॅक्टर फ्रेडी दारूवालाच्या वडिलांना ‘कोरोना’ची लागण ! BMC नं सील केला बंगला


पोलिसनामा ऑनलाइन –
बॉलिवूड स्टार फ्रेडी दारूवाला याच्या वडिलांना कोरोनाची लागण झाली आहे. ही बातमी समोर आल्यानंतर फ्रेडीचा मुबईतील बंगला बीएमसीनं सील केला आहे. अभिनेत्यानं याची पुष्टी केली आहे. त्यानं सांगितलं आहे की, सुरुवातीला वडिलांना ताप आणि अंगदुखीचा त्रास जाणवला होता.

एका इंग्रजी वृत्तानं दिलेल्या माहितीनुसार फ्रेडी म्हणाला, “माझ्या वडिलांना आधी अंगदुखी आणि तापाची लक्षणं जाणवली. म्हणून आम्ही हे हलक्यात घेतलं. परंतु जेव्हा आम्ही याची दखल येत तपासणी केली तेव्हा ते कोरोना पॉझिटीव्ह असल्याचं समजलं. डॉक्टरांनी त्यांना घरातच आयसोलेशनमध्ये राहण्याचा सल्ला दिला आहे.”

फ्रेडी पुढे म्हणाला की, “आम्हाला होम आयसोलेशनमध्ये काहीच अडचण नाही. कारण आमच्या बंगल्यात अनेक रुम्स आहेत. परंतु मला चिंता आहे ती फक्त माझा 15 महिन्यांचा मुलगा इवान याची.” असंही तो म्हणाला. फ्रेडीच्या वडिलांचं वय 67 वर्षे आहे.

फ्रेडीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर त्यानं रेस 3, हॉलिडे अशा अनेक सिनेमात काम केलं आहे.