‘या’ अभिनेत्रीच्या ‘हॉट’ फोटोंचा सोशलवर ‘राडा’, फोटो पोस्ट करताच क्षणात होतात ‘व्हायरल’ !

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – छोट्या पडद्यावरील अ‍ॅक्ट्रेस शमा सिकंदर नेहमीच आपल्या लुकमुळे चर्चेत असते. आपली शॉर्ट फिल्म सेक्सोहॉलिक मुळे शमा खूपच चर्चेत आली होती. काही दिवसांपूर्वीच शमाचे समुद्र किनाऱ्यावरील बिकिनी लुकमधील फोटो सोशलवर व्हायरल झाले होते. या फोटोंमध्ये ती आपल्या होणाऱ्या नवऱ्यासोबत मस्ती करताना दिसून आली होती.

शमाच्या करिअरबद्दल बोलायचे झाले तर, टीव्हीतून तिने आपल्या करिअरला सुरुवात केली होती. ये मेरी लाईफ है या मालिकेमुळे शमा चर्चेत आली होती. या मालिकेत ती प्रमुख भूमिकेत दिसली होती. तिच्या अ‍ॅक्टींगचे चाहत्यांनी नेहमीच कौतुक केले आहे. काही काळासाठी शमा लाईमलाईटपासून दूर होती. जेव्हा ती परत आली तेव्हा तिचा रंग रूप पूर्ण बदलून गेलं होतं. याबाबत बोलताना एका मुलाखतीत शमा म्हणाली होती की, “माझ्या आयुष्यातील एक वेळ अशी होती जेव्हा सुसाईड करण्याचा प्रयत्न केला होता.”

खरेतर ती बायोपोलर डिसरऑर्डरने ग्रस्त होती. हा एक मानसिक आजार आहे. ती या आजाराने इतकी त्रस्त झाली होती की, सतत सुसाईड करण्याबाबत विचार करत होती. एक वेळ अशी होती जेव्हा तिने जास्त प्रमाणात झोपेच्या गोळ्या खाऊन सुसाईड करण्याचा प्रयत्न केला. काही दिवसांपूर्वीच ती या आजारातून बरी झाली. 38 वर्षीय आजही खूप यंग, हॉट आणि सेक्सी दिसते.

आरोग्यविषयक वृत्त –

 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like