तंटामुक्त अध्यक्षाचा दारुच्या नशेत पोलिसांवर हल्ला

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाईन – न्यायालयाचे समन्स देण्यासाठी गेलेल्या पोलीस कर्मचाऱ्याला गावच्या तंटामुक्त अध्याक्षाने बेदम मारहाण केली. मारहाण केली त्यावेळी तंटामुक्त अध्यक्ष दारुच्या नशेत होता. त्याने दारुच्या नशेत पोलीस कर्मचाऱ्याला बेदम मारहाण करुन जखमी केले. हा प्रकार काल (शनिवारी) रात्री आठच्या सुमारास दक्षिण सोलापूर तालुक्यातील औज येथे घडला.

रामदास सलगर पाटील हा गावच्या तंटामुक्त समितीचा अध्यक्ष आहे. शनिवारी सायंकाळी न्यायालयाकडुन आलेल्या समन्सच्या कारणावरून पोपट पाटील व रामदास सलगर-पाटील यांच्यात भांडणे झाली होती. याची तक्रार आल्यानंतर सपोनि जाधव व अन्य पोलीस कर्मचाीर गावात गेले. तेथे झालेल्या प्रकाराची माहिती घेतल्यानंतर पोलीस पाटील रामदास सलगर-पाटील यांना बोलावण्यासाठी पो. कॉ. दिनेश पवार व अन्य तिन पोलीस कर्मचारी गेले.

दारात पोलीस आले आहेत म्हटल्यानंतर रामदास सलगर-पाटील हा घरातुन बाहेर आला. तो दारूच्या नशेत होता, त्याला पोलिसांनी भांडणे का केली असे विचारले असता त्याने पो.कॉ. दिनेश पवार यांच्या अंगावर जाऊन लाथाबुक्याने मारहाण केली. या प्रकरणी वळसंग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

मित्राने घातला २२ लाखांचा गंडा
पिंपरी : व्यवसायाच्या नावाखाली २२ लाख रुपये घेऊन पसार झालेल्या मित्राविरोधात चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणी विजय सोमनाथ दाते (वय- ४०, रा. बळवंत कॉलनी, चिंचवड ) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार, पांडुरंग भास्कर पाटील ( वय-४०, रा. बिजलीनगर, चिंचवड ) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी दाते आणि आरोपी पाटील हे मित्र आहेत. पाटील यांनी व्यवसाय करण्याच्या नावाखाली दाते यांचा विश्वास संपादन करून वेळोवेळी एकूण २२ लाख रुपये घेतले. दाते यांनी वारंवार मागणी करूनही पाटील पैसे न देता निघून गेला. पाटील यांनी फसवणूक केल्याचे लक्षात आल्याने दातेंनी पोलिसांत धाव घेतली. पुढील तपास चिंचवड पोलीस करीत आहेत