मानुषी छिल्लरच्या ‘बोल्ड’ बिकिनी लुकनं सोशल मीडियावर ‘राडा’ !

पोलीसनामा ऑनलाईन टीम :  2017 साली मिस वर्ल्डचा किताब जिंकणारी आणि देशाचं नाव रोशन करणारी विश्वसुंदरी मानुषी छिल्लर हिनं अलीकडेच तिचा 23 वा वाढदिवस साजरा केला आहे. मानुषीचा जन्म 14 मे 1997 रोजी हरियाणाच्या झज्जर मध्ये झाला होता. आज मानुषी जगातील सर्वात सुंदर महिलांपैकी एक मानली जाते. मानुषी छिल्लर हिचे हॉट फोटो सध्या इंटरनेटवर राडा घालताना दिसत आहेत.

मानुषीनं तिच्या इंस्टाग्रामवरून काही फोटो शेअर केले होते जे सध्या व्हायरल होत असून चर्चेत आले आहेत. या फोटोंची खास बात अशी की मानुषी बोल्ड बिकिनीत दिसत आहे. सध्या तिनं आपल्या हॉटनेसनं सोशलवर राडा घातला आहे. अनेकजण तिचा हॉट लुक पाहून घायाळ झाले आहेत.

मानुषीच्या व्हायरल होणाऱ्या फोटोंवर अनेक चाहत्यांनी कमेंट केली आहे.अनेकांनी तिच्या ब्युटी आणि हॉटनेसचं कौतुक केलं आहे. तिनं फोटो शेअर करायचा उशीर असतो की लगेचच तो सोशलवर व्हायरल होतो.

मानुषीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायंच झालं तर लवकरच ती अक्षय कुमारचा आगामी सिनेमा पृथ्वीराज चौहानमधून बॉलिवूड डेब्यू करणार आहे.