Raddish | मुळ्यासोबत ‘या’ गोष्टी कधीच खाऊ नका नाहीतर होऊ शकतात गंभीर आजार

पोलीसनामा ऑनलाइन टीम (Policenama online) – लोकांना अनेकदा कोशिंबीर किंवा पराठयामध्ये मुळा (Raddish) खायला आवडतो. चवदार असण्यासोबत आरोग्यासाठी देखील हे अत्यंत फायदेशीर मानला जातो. यात पौष्टिक आणि अँटी-ऑक्सिडेंट आणि अँटी-बॅक्टेरियाचे गुणधर्म आहेत जसे की व्हिटॅमिन सी, लोह, फॉलिक ॲसिड, कॅल्शियम इ. हे घेतल्यास तोंड, आतडे, किडणी, मधुमेह इत्यादी समस्या दूर होतात. परंतु मुळ्यासोबत (Raddish) काही गोष्टी सेवन करणे हानीकारक आहे…

1) मुळा आणि कारले

कारले जरी आरोग्यासाठी फायदेशीर असले तरी मुळा आणि कारले या दोघांचे सेवन एक सोबत करू नका अन्यथा आपल्याला समस्या होऊ शकते. यामुळे श्वसनाच्या समस्या उद्भवू शकतात. याशिवाय त्याचा हृदयावरही वाईट परिणाम होतो.

2) काकडी आणि मुळा

लोक सहसा काकडी आणि मुळा कोशिंबीर म्हणून खातात. आरोग्यासाठी फायदेशीर आहे असा विचार करतात.परंतु प्रत्यक्षात, काकडीमध्ये एस्कॉर्बिनाज़ असते, ज्यामुळे व्हिटॅमिन सी कोरडे होते.यामुळे दोघांचे सेवन करणे टाळावे.

3) दूध आणि मुळा

दूध आणि मुळा यांचे मिश्रण देखील अतिशय धोकादायक मानले जाते. यामुळे त्वचेची समस्या उद्भवू शकते. याशिवाय आरोग्याशी संबंधित समस्यांनाही सामोरे जावे लागते. म्हणून, निरोगी राहण्यासाठी, मुळा खाल्ल्यानंतर साधारण २-३ तासांनी दूध प्या.

4) संत्री आणि मुळा

मुळ्याबरोबर आंबट पदार्थ खाणे नेहमीच टाळले पाहिजे. अशावेळी संत्री आणि मुळा एकत्र कधीही खाऊ नका. यामुळे पोटाची समस्या उद्भवू शकते.

5) पाणी आणि मुळा

मुळा खाल्ल्यानंतर लगेच पाण्याचे सेवन करणे टाळले पाहिजे, अन्यथा खोकला आणि घश्याचा त्रास होऊ शकतो.

Web Title :-  Raddish | do not eat these things eating raddish

Join our Whatsapp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Viral Video | लग्नात वधूला मिठाईच्या बॉक्समध्ये मिळाले असे गिफ्ट, पाहताच बदलला चेहर्‍याचा रंग, पहा मजेदार व्हिडीओ

India Coronavirus Cases | देशात गेल्या 24 तासात कोरोनाचे 41 हजार नवे रूग्ण; आतापर्यंत 37 कोटी 60 लाख लोकांना देण्यात आली व्हॅक्सीन

कोरोनाच्या संसर्गात वाढ ! जागतिक आरोग्य संघटनेने दिले तिसऱ्या लाटेचे संकेत