राधाकृष्ण विखे-पाटलांना मंत्रीमंडळात मानाचं स्थान, क्रमांक ३चे मंत्री

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर माजी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांना भाजपने मंत्रिमंडळात गृहनिर्माण मंत्रीपद देऊन त्यांचा सन्मान केला. त्यानंतर आता त्यांना मंत्रिमंडळात ज्येष्ठताक्रमानुसार तिसरे स्थान देण्यात आले आहे. त्यामुळे ते कमी कालावधीतच मुख्यमंत्र्यांच्या जवळचे आणि विश्वासू मंत्री झाले आहेत. त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांना हवे तेव्हा आणि महत्वाची मदत करणारे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांना यामध्ये बारावे स्थान देण्यात आले आहे. सामान्य प्रशासन विभागाने जाहीर केलेल्या अधिसूचनेत हा मंत्र्यांचा जेष्ठताक्रम ठरवण्यात आला आहे.

त्यामुळे  विखे पाटील यांनी खूप कमी कालावधीत भाजपमध्ये मनाचे आणि महत्वाचे स्थान मिळवले असल्याची चर्चा रंगू लागली आहे.  नुकतेच त्यांनी विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांनी  मंत्रिमंडळ फेरबदलानंतर राज्यातील अनेक नवीन पालकमंत्र्यांची देखील नेमणूक केली आहे. यामध्ये त्यांनी आठ जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची नेमणूक केली आहे. यामध्ये वर्ध्याचे पालकमंत्री तसेच राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यावर गडचिरोलीच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी दिली आहे. तसेच शिवसेनेचे आमदार आणि राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्यावर पालघरच्या मंत्रिपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

खालीलप्रमाणे केली आहे नेमणूक
१)
सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री परिणय फुके : गोंदिया आणि भंडारा
२) कृषिमंत्री अनिल बोंडे : अमरावती
३) वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री रवींद्र चव्हाण : पालघर
४) अल्पसंख्याक कल्याण राज्यमंत्री अतुल सावे : हिंगोली
५) कामगारमंत्री संजय कुटे : बुलढाणा
६) ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे : नागपूर आणि वर्धा