Radha Krishna Vikhe Patil | तलाठी भरती : मंत्री राधाकृष्ण विखे यांचा विरोधकांना थेट इशारा, सरकारची बदनामी केली तर गुन्हे दाखल करू!

नगर : तलाठी भरती (Talathi Recruitment) प्रक्रियेत अनियमितता आणि घोटाळा झाल्याचा आरोप केला जात आहे. राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी तर याप्रकरणी चौकशीसाठी एसआयटी स्थापन करण्याची मागणी केली आहे. मात्र, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे (Radha Krishna Vikhe Patil) यांनी आरोप करत असलेल्यांना थेट इशाराच दिला आहे. सरकारची बदनामी केली तर गुन्हे दाखल करू, असे विखे यांनी म्हटले आहे.

राधाकृष्ण विखे यांनी म्हटले की, तलाठी भरती प्रक्रिया पारदर्शक आहे. गुणवत्ता यादी प्रचलित धोरणाप्रमाणे जाहीर केली आहे. प्रक्रियेत बाह्य हस्तक्षेप नाही. तरीही बेछूट आरोप केले जात आहेत. एक आमदार तर ३० लाख, २० लाख दिल्याचे आरोप करत आहे. हे आरोप प्रसिद्धीसाठी असून, बेछूट आरोप करून सरकारची बदनामी केल्यास गुन्हे दाखल करू.

विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केलेल्या एसआयटीच्या मागणीवर राधाकृष्ण विखे म्हणाले, चौकशीसाठी आम्ही
तयार आहोत. एसआयटीत वडेट्टीवार यांच्या पक्षाचे सदस्य नियुक्त करावेत, आमची काही हरकत नाही,
परंतु ही भरती प्रक्रिया रद्द होणार नाही.

राधाकृष्ण विखे म्हणाले, सन २०१७ व २०१९ मध्ये भरती प्रक्रिया राबवली गेली.
त्याच पद्धतीने सध्याही प्रक्रिया राबवत आहोत. टीसीएस या त्यावेळच्या कंपनीकडेच ही प्रक्रिया आहे.
१० लाख ४१ हजार उमेदवारांपैकी ८ लाख ६४ हजार उमेदवारांनी परीक्षा दिली. ४ जानेवारीला प्रक्रिया पूर्ण झाली.

राधाकृष्ण विखे म्हणाले, ५७ अवघड प्रश्नांचे सामान्यीकरणाद्वारे गुण देण्यात आले. यामध्ये विसंगत काही नाही.
त्यातूनच ४८ उमेदवारांना २०० पेक्षा अधिक म्हणजे २१४ गुण मिळाले आहेत.
भरती प्रक्रियेत कोणतीही अनियमितता झालेली नाही. आरोप करणाऱ्यांनी आधी माहिती घ्यावी.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune News | कात्रज डेअरीच्या जागेवरील मैदानाचे आरक्षण!, ‘राजकिय व प्रशासकिय’ व्यवस्थेने घातलेल्या घोळात दुध संघ व स्थानीक नागरिक वेठीस!

Fursungi Devachi Uruli Garbage Depot | फुरसुंगी देवाची उरुळी कचरा डेपोवर ‘बॉलिवूड’चे शुटिंग; अक्षय कुमार, सारा अली खानच्या ‘स्कायफोर्स’च्या शूटिंगसाठी मागणी

दीडशे रुपये मोबदला देऊन तरुणाचे साडे तेरा लाख हडपले, हडपसर मधील प्रकार

वाईन शॉपमधून विदेशी दारूसह रोकड लंपास, दापोडी मधील घटना