‘राधा प्रेम रंगी रंगली’ फेम अभिनेत्री अर्चना निपाणकरनं थाटला विवाह !

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  दीर्घकाळ रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर अभिनेत्री अर्चना निपाणकर आणि पार्थ रामनाथपूर यांनी लग्न केलं आहे. अर्चानानं काही फोटो सोशलवर शेअर केले आहेत. राधा प्रेम रंगी रंगली या मालिकेतून अर्चना लोकप्रिय झाली आहे. अनेक वर्षांपासून दोघं एकमेकांना डेट करत होते.

अर्चनानं तिच्या इंस्टावरून काही फोटो शेअर केले आहेत. हे फोटो तिच्या लग्न सोहळ्याचे आहेत. फोटोत अर्चनानं कांजीवरम साडी घातली आहे. वधुच्या अवतारात ती खूपच सुंदर दिसत आहे. अर्चनाचे फोटो समोर आल्यानंतर लगेचच सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसले. चाहत्यांसबोत इतर काही कलाकारही त्यांना शुभेच्छा देताना दिसले.

https://www.instagram.com/p/CCodJA_lr3G/

अभिनेत्री सायली संजीव, वीणा जगताप, जुई गडकरी, तितिक्षा तावडे, अभिजीत खांडकेकर अशा अनेक कलाकारांनी त्यांच्या या नव्या आयुष्यासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

आधीच झाला होता साखरपुडा

अर्चना आणि पार्थ यांचा याआधीच साखरपुडा झाला होता. याचेही फोटो अर्चनानं सोशलवर शेअर केले होते खूप व्हायरल झाले होते.

अशी झाली प्रेमाला सुरुवात

ओळखीच्या काही मित्रांमुळं अर्चना आणि पार्थ यांची ओळख झाली होती. याच ओळखीचं रूपानंतर नंतर प्रेमात झालं. कॉलेजला असल्यापासून दोघं एकमेकांना ओळखत होते. लॉकडाऊनमध्ये त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला.

अर्चनाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर का रे दुरावा या मालिकेतून तिनं अभिनयाला सुरुवात केली होती. यानंतर ती 100 डेज या मालिकेत दिसली. याशिवाय तिनं राधा प्रेम रंगी रंगली या मालिकेत काम केलं. मालिकांव्यतिरीक्त तिनं मराठी आणि हिंदी सिनेमातही काम केलं आहे.