राजकीय

Radhakrishna Vikhe Patil | ‘नगरच्या एका मंत्र्याच्या पापाचा घडा भरलाय’ (व्हिडीओ)

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन –  Radhakrishna Vikhe Patil | अहमदनगर जिल्ह्यातील एका मोठया मंत्र्याचे नाव भ्रष्ट्राचारात येत असून कोणी किती महसूल गोळा केला. हे आपोआप समोर येईल, असं सुचक विधान भाजपचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी केलं आहे. त्यावेळी विखे पाटील यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काॅग्रेसवर जोरदार निशाणा साधला आहे. विखे पाटील यांनी कोणाचं नाव घेता असं वक्तव्य केल्याने जिल्ह्यात राजकारणात चर्चेला उधाण आलं आहे.

श्रीरामपूरमध्ये राधाकृष्ण विखे पाटील  हे पत्रकारांशी बोलत होते. त्यावेळी विखे पाटील यांनी हा आरोप केला आहे. विखे पाटील बोलताना जिल्ह्यातील एका मोठया मंत्र्याचे नाव भ्रष्ट्राचारात येत असून कोणी किती महसूल गोळा केला. हे आपोआप समोर येईल, असं वक्तव्य केल्याने त्यांचा रोख हा काॅग्रेस नेते आणि राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांच्याकडे असल्याचं दिसून येत आहे.

दरम्यान, त्यावेळी विखे पाटील हे पत्रकारांशी संवाद साधत असताना हा मंत्री कोण, असं पत्रकारांनी सवाल केला. ‘जरा सबुरीने घ्या, लवकरच नाव उघड होईल,’
असं देखील विखे पाटील यांनी म्हटलं आहे. त्यावेळी बोलताना ते म्हणाले की, नगर जिल्ह्यातील एका मंत्र्याच्या पापाचा घडा भरला असून कोणी किती महसूल गोळा केला.
हे आपोआप समोर येईल. असं विखे पाटील यांनी म्हटलं आहे.

 

Web Title : Radhakrishna Vikhe Patil | ahmednagar bjp leader radhakrishna vikhe patil taunt maharashtra minister balsaheb thorat

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

NCP MLA Ashok Pawar | राष्ट्रवादीचे आमदार अशोक पवारांना जीवे मारण्याची धमकी (व्हिडिओ)

Pimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’च्या 84 रुग्णांना डिस्चार्ज, जाणून घ्या इतर आकडेवारी

Maharashtra Unlock | राज्यातील उपाहारगृहे, दुकाने यांच्या वेळा वाढविणार; वेळा वाढविण्यासंदर्भात मार्गदर्शक सूचना, मुख्यमंत्र्यांकडून निर्बंध शिथील 

Back to top button