जिल्हा भाजपात विखे पिता-पुत्र ‘एकाकी’

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – जिल्ह्यात भाजपा पक्षातील सर्वजण एकवटले असताना विखे पिता-पुत्र मात्र एकाकी पडले आहेत. विधानसभा निवडणुकीत दगाबाजी केल्याच्या संशयावरून बीजेपीचे सर्व जण विरोधात एकवटले आहेत. पिता-पुत्र एकाकी पडल्यामुळे राधाकृष्ण विखे-पाटील यांची मंत्रिपदाची संधी हुकणार का, अशी चर्चाही राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत कोपरगाव, राहुरी, पारनेरसह इतर अनेक मतदारसंघातील महायुतीच्या जागा विखे पिता-पुत्रांच्या पाडापाडीच्या राजकारणामुळे कमी झाल्या. ही बाब जिल्ह्यातील पराभूत मंत्री राम शिंदे व इतर पराभूत आमदार, विजयी आमदार मोनिका राजळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कानावर घातली आहे. पिता-पुत्रांनी केलेले राजकारण लेखी स्वरुपात त्यांच्याकडे मांडलेले आहे.

जिल्हा भाजपात पिता-पुत्र एका बाजूला व भाजपचे इतर सर्व एका बाजूला अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा राजकीय परिस्थितीत एकाकी पडलेली पिता-पुत्र चर्चेचा विषय ठरले आहेत. त्यांच्या बाजूने जिल्ह्यातील भाजपाचा एकही जबाबदार व्यक्ती नाही. त्यामुळे यंदा राधाकृष्ण विखे-पाटील यांची मंत्रिपदाची संधी हुकणार का, अशी चर्चा सुरू झाली आहे.

Visit : Policenama.com