Radhakrishna Vikhe Patil | ‘भारत जोडो’ यात्रा नसून जत्रा आहे – राधाकृष्ण विखे पाटील

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Radhakrishna Vikhe Patil | काँग्रेस (Congress) नेते आणि खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या नेतृत्वात सुरु असलेली कन्याकुमारी ते काश्मीर 3750 किमीची पदयात्रा आज (दि. 09 नोव्हेंबर) महाराष्ट्रात दाखल झाली आहे. या यात्रेचे मोठ्या प्रमाणात स्वागत केले जात आहे. तर दुसरीकडे भाजप (BJP) आणि त्यांचे मित्रपक्ष या यात्रेवर टीका करत आहेत. महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी भारत जोडो यात्रेवर टीका करताना म्हंटले ही काँग्रेसची भारत जोडो यात्रा नाहीतर, जत्रा आहे.

यावेळी विखे पाटील यांनी विविध मुद्यांवर भाष्य केले. विखे पाटील म्हणाले, संजय राऊतांची (Sanjay Raut) सुटका ही न्यायालयीन प्रक्रिया आहे. त्यामुळे मी त्याच्यावर भाष्य करणार नाही. ज्यावेळी पूर्ण निकाल हाती येईल, त्यावेळी भाष्य करणे योग्य ठरेल. संजय राऊतांच्या सुटकेवर असुरी आनंद व्यक्त करुन महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) स्वत:चे अपयश झाकण्याचा प्रयत्न करत आहे. त्यांचे ते कामच आहे. वास्तव त्यांनी स्वीकारले पाहिजे.

तसेच, महानंदाची अवस्था बिकट आहे. जास्त नोकरभरतीमुळे अवास्तव पगाराचा बोझा महानंदवर आला आहे.
दूध संकलन देखील कमी झाले आहे, असे महानंदच्या नोकरभरतीवर बोलताना विखे पाटील
(Radhakrishna Vikhe Patil) म्हणाले.

भारत जोडो यात्रा एक शो आहे. जनतेला जोडून ठेवण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे. ह्यात जनता सामील नाही.
नेते सहभागी झाले आहेत. ज्यांची विश्वासार्हता संपलेली आहे ते रोड शो मध्ये करणार काय,
महाराष्ट्रात काँग्रेसची अवस्था बिकट आहे. त्यामुळे ही यात्रा (Bharat Jodo) नसून जत्रा आहे, असे विखे पाटील म्हणाले.

Web Title :-  Radhakrishna Vikhe Patil | ‘Bharat Jodo’ is not a yatra but a fair

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

MP Sanjay Raut | ‘सत्यमेव जयते! टायगर इज बॅक’, संजय राऊतांच्या सुटकेनंतर विविध नेत्यांच्या प्रतिक्रिया, जणून घ्या कोण काय म्हणाले?

T20 World Cup | सेमी फायनलपूर्वी इंग्लंडला दुसरा धक्का ! ‘हा’ प्रमुख खेळाडू झाला जखमी