‘काँग्रेस-राष्ट्रवादी’तील अनेक जण प्रवेशासाठी इच्छुक असल्याचा राधाकृष्ण विखे पाटील यांचा ‘गौप्यस्फोट’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – माजी विरोधी पक्षनेते आणि विद्यमान गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीविषयी नवीन गौप्यस्फोट केला आहे. काही दिवसांपूर्वी विखे पाटील यांनी काँग्रेसचा राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांना मंत्रिमंडळ विस्तारात मंत्रिपद देऊन भाजपने प्रवेश दिला. यानंतर आता सोलापूरमध्ये त्यांनी गौप्यस्फोट करताना म्हटले आहे कि, काँग्रेस आणि राष्ट्रवादीमधील अनेक आमदार भाजप आणि शिवसेनेत प्रवेश करण्यासाठी इच्छुक आहेत. मात्र यासंदर्भातील निर्णय हे पक्षश्रेष्ठी घेणार आहेत. आघाडीत अनेक आमदार नाराज असून तेदेखील प्रवेश करण्यासाठी तयार आहेत. आषाढी एकादशीनिमित्त विखे पाटील हे सोलापूर दौऱ्यावर असून पत्रकारांशी बोलताना त्यांनी हे विधान केले आहे.

पत्रकारांनी त्यांना तुमच्याबरोबरचे बाकीचे आमदार कधी भाजपमध्ये प्रवेश करणार असे विचारले असता त्यांनी म्हटले कि, राज्यातील अनेक नेते माझ्या संपर्कात असून लवकरच याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे. यावेळी पत्रकारांनी त्यांना आदित्य ठाकरे यांच्या मुख्यमंत्रीपदाबाबत प्रश्न विचारला असता त्यांनी या प्रश्नावर उत्तर देणे टाळताना म्हटले कि, याबाबत दोन्ही पक्षाचे नेते निर्णय घेतील. त्याचबरोबर त्यांनी आज मराठा आरक्षणावर स्थगिती देण्यास सुप्रीम कोर्टाने नकार दिल्याच्या निर्णयावर बोलताना म्हटले कि, हा मराठा समाजाचा विजय असून भाजप संपूर्णपणे मराठा समाजाच्या मागे उभा आहे.

दरम्यान, आघाडीतील अनेक आमदार भाजप आणि शिवसेनेत प्रवेश करणार असून परवाच राष्ट्रवादीच्या शहापूरच्या आमदारांनी देखील शिवसेनेत प्रवेश केला. त्याचबरोबर बीडमधील राष्ट्रवादीचे मोठे नेते जयदत्त क्षीरसागर यांनीदेखील दोन महिन्यांपूर्वी शिवसेनेत प्रवेश केला होता.

आरोग्यविषयक वृत्त –

‘नागीण’ या आजारावर ‘हे’ घरगुती उपाय !

‘या’ ५ कारणांमुळे होते ‘किडनी’ खराब, जाणून घ्या

‘मक्याचं’ कणीस खाल्यावर लगेच पाणी पिणे पडेल ‘महागात’

डोकेदुखीने त्रस्त आहात का ? हे घरगुती रामबाण उपाय करा

अपचनाची समस्या अशी दूर करा, हे आहेत प्रभावी ६ घरगुती उपाय

पावसाळ्यात आलू बुखार आवश्य खा, यात आहेत भरपूर ‘व्हिटामिन्स’

दात पांढरेशुभ्र हवे असतील तर लिंबाचा असा करा उपयोग

वॅक्स करताना घ्या ‘या’ गोष्टींची काळजी !

‘या’ कारणामुळे फुटतो घोळाणा ; घ्या जाणून