पृथ्वीराज चव्हाणांनी माझी काळजी सोडावी : राधाकृष्ण विखे पाटील

लोणी : पोलीसनामा ऑनलाइन – काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपामध्ये प्रवेश केलेल्या राधाकृष्ण विखे पाटील यांना भाजपाने मंत्रीमंडळ विस्तारात कॅबिनेट मंत्री केले. गृहनिर्माण मंत्री झाल्यानंतर राधाकृष्ण विखे पाटील पहिल्यांदाच आपल्या मुळगावी आले आहेत. मंत्रीपद मिळाल्यामुळे उत्साही कार्य़कर्त्यांनी त्यांचे मोठ्या जल्लोषात स्वागत केले. यानंतर त्यांना विचारण्यात आलेल्या अनेक प्रश्नांना उत्तरे देऊन काँग्रेस आणि त्यांच्या नेत्यांवर टीका केली.

लोणी गावात आल्यानंतर त्यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर टीका करताना म्हणाले, पृथ्वीराज चव्हाण यांनी माझी काळजी करू नये. ज्यांच्यामुळे काँग्रेसची अधोगती झाली त्याची त्यांनी काळजी करावी. ते मुख्यमंत्री असताना राज्यात ८२ वरून ४२ जागा काँग्रेसच्या आल्या. माझ्या विरोधात याचिका न्यायालयात असल्याने त्यावर भाष्य करणार नाही असेही त्यांनी यावेळी सांगितले.

भाजपा विषयी बोलताना राधाकृष्ण विखे-पाटील म्हणाले, भाजपाने माझ्यावर विश्वास व्यक्त करून कॅबिनेट मंत्रीपद दिले. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, पक्षाचे अध्यक्ष अमित शहा, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माझ्यावर जो विश्वास दाखला आहे. त्या विश्वासाला मी पात्र राहण्याचा प्रयत्न करीन. दुष्काळावर बोलताना ते म्हणाले, दुष्काळाची दाहकता पाहता सरकारकडून जी अपेक्षा आहे त्यापेक्षा जास्त मदत करत असल्याचे सांगून सरकारचे कौतुक केले.

आरोग्य विषयक वृत्त

सावधान ! ‘या’ लोकांना ‘आइस टी’चे सेवन पडू शकते महागात

मेकअप रिमूव्ह करुन झोपा नाहीतर त्वचेला होईल नुकसान

हाताला ६ बोटे असणे असते फायद्याचे

कोल्हापूरचं हृद्य धडधडतंय पुण्यात