राधाकृष्ण विखेंच्या भाजप प्रवेशाबाबत मंत्री गिरीश महाजन यांचे ‘मोठे’ वक्तव्य

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील सध्या काँग्रेसमध्येच राहणार असून लोकसभा निवडणूक निकालानंतर भाजप प्रवेशाबाबत निर्णय घेणार असल्याचे समजतेय. राधाकृष्ण विखे पाटील यांचे भाजपमध्ये स्वागत आहे. मात्र, ते सध्या भाजपात प्रवेश करणार नसून लोकसभेच्या निवडणुकांच्या निकाल लागल्यानंतर ते याबाबत निर्णय घेणार आहेत, असे भाजप नेते गिरीश महाजन यांनी सांगितले.

सुजय विखे पाटील यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर राधाकृष्ण विखे पाटील यांच्या भाजपप्रवेशाची चर्चा रंगली होती. नगरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेत विखे पाटील भाजपात प्रवेश करण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र, विखे पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला नाही.

राधाकृष्ण विखे पाटील काँग्रेसमध्येच राहणार असून ते भाजपात प्रवेश करणार नसल्याचे सुजय विखे यांनी स्पष्ट केले. आपण भाजपमध्ये प्रवेश केला ही आपली वैयक्तिक बाब आहे. त्याच्याशी राधाकृष्ण यांचा संबंध नसून ते भजपमध्ये प्रवेश करण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचे सांगत सुजय यांनी याबाबतच्या चर्चांना पूर्णविराम दिला होता. त्यातच लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राधाकृष्ण विखे पाटील भाजप प्रवेशाबाबत निर्णय घेतील असे गिरीश महाजन यांनी स्पष्ट केले आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like