Radhakrishna Vikhe-Patil | बैलगाडा शर्यतींबाबत लम्पी चर्मरोगाच्या स्थानिक परिस्थितीचा आढावा घेऊन निर्णय- राधाकृष्ण विखे- पाटील

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – लम्पी चर्म रोगाची (Lumpy Skin Disease) संबंधित जिल्ह्यातील स्थितीचा आढावा घेऊन जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांनी स्थानिक स्तरावर बैलगाडा शर्यतीच्या (Bullock Cart Race) आयोजनात शिथिलता देण्याबाबत निर्णय घेण्याचे निर्देश पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील (Radhakrishna Vikhe-Patil) यांनी दिले. विखे- पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैलगाडा शर्यतींच्या अनुषंगाने बैलगाडा मालक संघटनेच्या शिष्टमंडळासोबत विधानभवन येथे आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी राधाकृष्ण विखे-पाटील (Radhakrishna Vikhe-Patil) बोलत होते.

 

बैठकीस आमदार महेश लांडगे (MLA Mahesh Landge), पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास, मत्स्यव्यवसाय विभागाचे प्रधान सचिव जे.पी. गुप्ता (Principal Secretary J.P. Gupta), पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह (Sachindra Pratap Singh) तसेच बैलगाडा मालक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

 

बैलगाडा शर्यती सुरू रहाव्यात ही शासनाची भूमिका असून त्यासाठी शासन खंबीरपणे आपली भूमिका बजावेल. बैलगाडा शर्यतीबाबत सर्वोच्च न्यायालयातील (Supreme Court) अंतिम सुनावणीसाठी बाजू मांडण्यासाठी नेमण्यात आलेल्या वरिष्ठ विधिज्ञांना आवश्यक ते सर्व सहकार्य शासनाच्यावतीने देण्यात येईल, असेही राधाकृष्ण विखे-पाटील (Radhakrishna Vikhe-Patil) यांनी यावेळी सांगितले.

 

यावेळी आमदार लांडगे तसेच बैलगाडा मालक संघटनांच्या प्रतिनिधींनी पशुसंवर्धन विभागाने लम्पी चर्मरोग उपाययोजनेसाठी गतीने लसीकरण (Vaccination) हाती घेतल्यामुळे लम्पीचा प्रादुर्भाव आटोक्यात आल्याबद्दल समाधान व्यक्त केले.

 

Web Title :- Radhakrishna Vikhe-Patil | Decision on bullock cart races after reviewing the local situation of lumpy skin disease

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

T20 World Cup | पाकिस्तानचा आफ्रिकेवर मोठा विजय ! सेमी फायनलची रंगत अजून वाढली

Bachchu Kadu | रवी राणांच्या ‘घरात घुसून मारेन’च्या धमकीवर बच्चू कडूंची सावध प्रतिक्रिया, म्हणाले, ‘तीन वाजता…’

Ajit Pawar | पुण्यात अजित पवारांच्या सभेआधी बॅनर लावण्यावरून मोठा वाद, दोन गटात तणाव