भाजपच्या वरिष्ठांकडून राधाकृष्ण विखे-पाटलांच्या मंत्रीपदाला ‘रेड’ सिग्‍नल ?

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – माजी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी आपल्या काँग्रेस सदस्यत्व आणि विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिल्यानंतर भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा आहेत. तसेच त्यांच्याकडून देखील अनेक वेळा या गोष्टीला दुजोरा देण्यात आलेला आहे. त्याचबरोबर भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांना लगेच मंत्रिपद देखील देण्यात येणार असल्याची देखील माहिती मिळत आहे. मात्र मागील १५ दिवसांपासून फक्त त्यांच्या प्रवेशाच्या चर्चा रंगात आहेत. त्यांचा प्रवेश कधी होणार याचा काही पत्ता लागत नाही. त्यामुळे विखे यांच्याबरोबर प्रवेश करू इच्छिणाऱ्या आमदारांचा देखील जीव टांगणीला लागला आहे. मुख्यमंत्र्यांनी त्यांना याबाबत सबुरीचा सल्ला दिला आहे.

मात्र या सगळ्यात नवीन माहिती समोर येत आहे. भाजप अध्यक्ष अमित शहा हे विखे यांच्या प्रवेशाबद्दल सकारात्मक असले तरी त्यांच्या मंत्रिपदाबद्दल ते सकारात्मक नसल्याचे समजते आहे. जर विखे पाटील यांना मंत्रिपद दिले तर तो काही महिन्यांपूर्वी भाजप प्रवेश करू इच्छिणाऱ्या काँग्रेसचे माजी नेते नारायण राणे यांच्यावर अन्याय ठरेल असे अमित शहा यांना वाटत असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे आता राधाकृष्ण विखे पाटील काय निर्णय घेणार एखादे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. त्यामुळे राधाकृष्ण यांना पक्षात प्रवेश द्यावा मात्र त्यांना मंत्रिपद देण्यात येऊ नये अशा सूचना अमित शहा यांनी मुख्यमंत्र्यांना दिल्याचे समजत आहे.

दरम्यान, काही महिन्यांपूर्वी नारायण राणे यांनी काँग्रेसला रामराम करत भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला होता, मात्र अमित शहा यांनी त्यांना नवीन पक्ष काढून तो एनडीए मध्ये सामील करण्याचा सल्ला दिला होता. त्याप्रमाणे राणे यांनी ‘महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची’ स्थापना करत भाजपला पाठिंबा दिला होता.

सिने जगत –

#Video : भोजपुरीचं सर्वात लोकप्रिय ‘ऑनस्क्रीन’ कपल झालं ‘विभक्‍त’ ; पण, त्यांचा जुना व्हिडीओ घालतोय धुमाकूळ

कतरिना कैफने करिअरबाबतीत केला ‘हा’ मोठा खुलासा

#Video : ‘बाहुबली ३’ चित्रपटाचे निर्देशन ‘या’ निर्मात्याने केले पाहिजे : तमन्ना भाटिया

अर्जुन कपूरच्या शर्टलेस फोटोला पाहून ‘थक्क’ झाली मलायका, म्हणाली……