राधाकृष्ण विखे-पाटलांनी घेतले कोल्हापूरच्या अंबाबाईचे दर्शन

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाईन – विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज कोल्हापुरात महालक्ष्मी मंदिरात अंबाबाईचे दर्शन घेतले. यावेळी ते कोल्हापुरात आपल्या खासगी हेलिकॉप्टर ने आले होते. महालक्ष्मीचे दर्शन घेतल्यानंतर त्यांना माध्यमांकडून प्रश्न विचारण्यात आले. मात्र, त्यांनी यावेळी माध्यमांशी बोलण्यास नकार दिला. माध्यमातील प्रतिनिधींनी त्यांना कोल्हापुरात येण्यामागचे कारण विचारले असता त्यांनी अंबाबाईच्या दर्शनासाठी आलो होतो इतकेच उत्तर दिले.

सध्या विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे सुपुत्र सुजय विखे पाटील यांनी भाजप पक्षात प्रवेश केला आहे. त्यावरून विखे कुटुंब सध्या चर्चेत आहे. तसेच मुलाच्या भाजप प्रवेशानंतर आता विखे राजीनामा देणार का ? अशी देखील जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.

ह्याही बातम्या वाचा –

पालघर मतदारसंघात सर्वच पक्षांची उमेदवार शोधासाठी पंचाईत

शरद पवारांच्या ‘त्या’ वक्तव्यावर उद्धव ठाकरेंचा टोला

लोकसभा निवडणूक : नरेंद्र मोदींनी राहुल गांधींसह इतर नेत्यांना केले ‘हे’ आवाहन

जालन्याचा तिढा सुटला ; ईशान्य मुंबईचं काय ?

मोदींची सेलिब्रेटींना मतदानासाठी विनंती, मतदान करा !