Radhakrishna Vikhe Patil | ‘राज्य सरकारने भ्रष्टाचाराचे सगळे विक्रम मोडले’ – विखे पाटील

शिर्डी : पोलीसनामा ऑनलाइन राज्यातील सामान्य नागरिक आणि शेतकरी अडचणीत असताना महाविकास आघाडी सरकारमधील (MVA Government) मंत्री मात्र स्वत:ला लक्ष्मीकरता प्रसन्न करुन घेत आहेत, अशी टीका भाजपचे (BJP) ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी केली आहे. तसेच राज्यातील जनता उपाशी आणि मंत्री तुपाशी असून राज्य सरकारने भ्रष्टाचाराचे (corruption) सगळे विक्रम मोडले आहेत, अशी जळजळीत टीका देखील राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी केली.

 

राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी आज प्रवरानगर येथील प्रवरा शिक्षण संस्था (Pravara Shikshan Sanstha)
आणि साखर कारखान्यात (Pravara Sugar Factory) सपत्नीक लक्ष्मीपूजन केले.
यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारवर टीकास्त्र सोडलं.

 

राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, आघाडी सरकारवर लक्ष्मी रुसलीये की प्रसन्न आहे? माहित नाही परंतु हे स्वत:लाच लक्ष्मी करता प्रसन्न करुन घेत आहेत.
आज राज्यातील सामान्य नागरिक, शेतकरी अडचणीत आहेत. मात्र महसूल (Revenue) गोळा करण्यात मंत्र्यांचा वेळ चाललाय.
शेतकरी उपाशी आणि मंत्री तुपाशी अशी अवस्था राज्याची झाली आहे, अशी घणाघाती टीका त्यांनी केली.

 

महसुलमंत्र्यांचा अभ्यास कमी पडतोय

 

केंद्र सरकारने (Central Government) पेट्रोल डिझेलचे दर कमी (Petrol diesel price reduction) केले आहेत.
यावरून महसूलमंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी टीका केली होती.
थोरात यांच्या टीकेचा खरपूस समाचार घेताना विखे पाटील म्हणाले, महसूल मंत्र्यांचा अभ्यास कमी पडतोय.
केंद्राने जीएसटी (GST) थकवला ही वस्तुस्थिती नसून राज्यातील मंत्र्यांचा केंद्राकडे बोट दाखवण्याचा एकमेव कार्यक्रम सुरु आहे.
आपल्या दिव्याखाली अंधार आहे ना? राज्यातील मंत्र्यांनी भ्रष्टाचारातून थोडं बाजूला येऊन जनतेच्या प्रश्नाकडे लक्ष द्यावं, असा टोला त्यांनी थोरातांना लगावला.

 

सर्व केंद्र सरकारनेच करायचं का?

 

पेट्रोल डिझेलचे दर केंद्र सरकारने कमी केले आहे सर्व केंद्र सरकारनेच करायचं का? राज्य सरकारने कोविडमध्ये मृत्यूमुखी पडलेल्यांना मदत केली नाही.
लसीकरणातही संधी होती मात्र केवळ पाहत बसले. राज्य सरकार सगळ्याच पातळीवर अपयशी झालं असून केवळ दिवसा गणिक भ्रष्टाचाराची प्रकरणे बाहेर येत आहेत.
भ्रष्टाचाराचे सगळे उच्चांक महाविकास आघाडीने मोडले असल्याची टीका राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली.

 

Web Title : Radhakrishna Vikhe Patil | Maharashtra government broke all records of corruption say bjp leader radhakrishna vikhe patil in shirdi of nagar district

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Latur District Bank Election | काँग्रेसला झटका, लातूर जिल्हा बँक निवडणुकीत बाद ठरलेले विरोधाकांचे अर्ज वैध

Pune News | मॉडेल कॉलनी भागातील दिव्यांग व्यक्तींना, सोसायटी वॉचमन व स्वच्छ संस्थेतील सदस्यांना भाजपकडून सरंजाम व दिवाळी किटची भेट

Supriya Sule | ‘इंदापुरात मी पाटलांना घाबरतो’ राज्यमंत्री दत्तात्रय भरणेंच्या वक्तव्यावरुन सुप्रिया सुळेंची टोलेबाजी, म्हणाल्या…