‘मंत्रि’ पदाची शपथ घेतल्यानंतर 24 तासाच्या आत राधाकृष्ण विखे-पाटलांच्या अडचणीत वाढ

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – माजी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी आपल्या काँग्रेस सदस्यत्व आणि विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा  देत भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांना लगेच मंत्रिपदाची लॉटरी देखील लागली. रविवारी झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात त्यांना गृहनिर्माण खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे. मात्र आता मंत्रिपदाची शपथ घेऊन दोन दिवस होत नाहीत तोच त्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांना दिलेलं मंत्रिपद घटनाविरोधी असल्याचं म्हणत उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. सतीश तळेकर यांनी ही याचिका दाखल केली आहे.

तसेच राधाकृष्ण विखे पाटील यांना  घटनेच्या कोणत्या चौकटीत राहून मंत्रिपद दिले गेले आहे, असा प्रश्न देखील या याचिकेत विचारण्यात आला आहे. त्याचबरोबर राज्यात कोणतीही अपवादात्मक परिस्थिती नसताना राधाकृष्ण विखे पाटील यांना मंत्रिपद  का दिलं? अशी प्रश्न या याचिकेत विचारण्यात आला आहे. त्याप्रमाणेच राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी देखील हाच प्रश्न उपस्थित करत मुख्यमंत्र्यांना विचारले होते कि, भाजपानं स्थिर सरकार चालवण्यासाठी काही नियम-कायदे  केले आहेत काय? असा सवाल देखील त्यांनी मुख्यमंत्र्यांना विचारला. एखाद्या व्यक्तीने राजीनामा दिल्यानंतर त्याला ६ महिन्याच्या आत कोणत्याही सभागृहाचे सदस्य व्हावे लागते. कोणत्याही सभागृहाचे सदस्य नसताना तुम्हाला मंत्रिपदाची शपथ घेता येते का ? असा प्रश्नदेखील त्यांनी यावेळी विचारला होता.

दरम्यान, यामुळे भ्रष्टाचार बोकाळेल अशी देखील भीती त्यांनी या याचिकेमध्ये व्यक्त केली आहे. त्यामुळे आता न्यायालय हि याचिका दाखल करून घेते कि, रद्द करते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.