Radhakrishna Vikhe Patil On Congress Leadership | ‘काँग्रेस नेतृत्वाने आता संन्यास घेऊन हिमालयात जावे’ – राधाकृष्ण विखे पाटील

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Radhakrishna Vikhe Patil On Congress Leadership | गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीची (Gujarat Election Results) मतमोजणी सुरू आहे. गुजरातमध्ये भाजपला स्पष्ट बहुमत दिसत आहे. त्यामुळे आता भाजप नेत्यांनी काँग्रेसवर तोंडसुख घेणे सुरू केले आहे. गुजरात विकासाच्या मॉडेलला जनतेने मते दिली, गुजरात विकासाच्या मॉडेलवर जनतेने पुन्हा एकदा विश्वास दाखवला आहे, असे राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) म्हणाले. तसेच त्यामुळे आता काँग्रेसच्या पक्ष नेतृत्वाने संन्यास घेऊन हिमालयात जावे, असेही राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले. (Radhakrishna Vikhe Patil On Congress Leadership)

 

गुजरातमध्ये आता काँग्रेस पक्षाचे (Congress) अस्तित्व संपले आहे. भाजप (BJP) आघाडीवर आहे. जनतेने भाजपच्या पारड्यात कौल टाकला आहे. त्यामुळे विखे पाटलांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांचे अभिनंदन केले. भाजपला गुजरातमध्ये 56 टक्के मतदान झाले आहे. हा देशाच्या इतिहासातील विक्रम असल्याचे विखे पाटील म्हणाले. गुजरातमध्ये भाजपने आघाडी घेतली असली, तरी हिमाचल प्रदेशमध्ये भाजप पिछाडीवर आहे. त्यावर बोलताना विखे पाटील म्हणाले, हिमाचलमध्ये काँग्रेसचे केंद्रीय नेतृत्व नव्हे, तर स्थानिक नेतृत्वाला पाहून काँग्रेसला मतदान केले गेले आहे. स्थानिक परिस्थितीवर आधारून काँग्रेसला हिमाचलमध्ये मतदान मिळाल्याचे विखे पाटील म्हणाले. (Radhakrishna Vikhe Patil On Congress Leadership)

राधाकृष्ण विखे पाटील यांनी यावेळी शिवसेनेच्या खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावरही जोरदार टीका केली.
संजय राऊतांच्या आरोपांना काय उत्तर देणार? ते बिनबुडाचे गाडगे आहे, असे विखे पाटील म्हणाले.
यापुढे भाजप आणि त्यांची आघाडीच महाराष्ट्रात सत्तेवर येईल, असेही विखे पाटील म्हणाले.

 

Web Title :- Radhakrishna Vikhe Patil On Congress Leadership | maharashtra minister radhakrishna vikhe patil criticism on congress for gujarat assembly election result

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime | वैद्यकीय विद्यार्थ्याला लुटल्यानंतर नग्न व्हिडिओ काढणाऱ्या 3 जणांना अटक

Karnataka Rakshana Vedike – Sanjay Raut | कन्नड रक्षण वेदिकेने दिली संजय राऊतांना जीवे मारण्याची धमकी, धमकीचे 2 फोन

Pimpri Chinchwad Bandh | महाराष्ट्रातील महापुरुषांच्या बदनामी विरोधात गुरुवारी पिंपरी-चिंचवड बंद, छत्रपती संभाजीराजे होणार सहभागी

Pune PMC News – Parvati Hill | ‘पर्वती हिलटॉप हिलस्लोपवरील जागा रहिवासी करून मूळ मालकाला देण्याच्या आदेशाची अंमलबजावणी नको’ – सर्वोच्च न्यायालय