Radhakrishna Vikhe Patil On Girish Bapat | राजकारणातील मित्रत्व जोपासणारे लोकाभिमुख नेतृत्व गमावले; राधाकृष्ण विखे पाटील यांची श्रद्धांजली

मुंबई : Radhakrishna Vikhe Patil On Girish Bapat | “भाजपचे नेते आणि खासदार गिरीष बापट यांच्या निधनाने राजकारणातील मित्रत्व जोपासाणारे लोकाभिमुख नेतृत्व गमावले” अशी भावना राज्याचे महसूल, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केली. (Radhakrishna Vikhe Patil On Girish Bapat)

आपल्या शोकसंदेशात मंत्री विखे पाटील म्हणाले की, गेली अनेक वर्षे विधिमंडळात त्यांचा सहवास लाभला. विरोधी पक्षनेता म्हणून काम करताना त्यावेळी श्री. बापट संसदीय कामकाज मंत्री म्हणून काम पाहायचे. राजकारणात फार कटूता येऊ न देता सभागृहातील निर्माण होणाऱ्या पेचप्रसंगावर संवादाने मार्ग काढण्याची त्यांची हातोटी होती.

महानगरपालिका ते लोकसभा हा गिरीष बापट यांचा राजकीय प्रवास त्यांच्या लोकाभिमुख कार्याचा होता.
पुणे आणि गिरीष बापट हे एक अतूट नाते होते.
त्यांच्या जाण्याने भारतीय जनता पक्षाचे मोठे नुकसान झाले असून पक्षाच्या वाटचालीतील एक अनुभवी नेतृत्व
काळाच्या पडद्याआड गेल्याची संवेदना व्यक्त करून मंत्री विखे पाटील यांनी गिरीष बापट यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

Web Title :- Radhakrishna Vikhe Patil On Girish Bapat | Lost the people-oriented leadership that fostered friendship in politics; Tribute to Radhakrishna Vikhe Patil

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

AFINDEX-23 | भारत- आफ्रिका यांच्यातील संयुक्त लष्करी सराव, AFINDEX-23 चा पुण्यात समारोप

Devendra Fadnavis On Girish Bapat | जमिनीशी नाळ असलेले राजकारणातील उत्तुंग व्यक्तिमत्त्व हरपले! खा. गिरीश बापट यांना देवेंद्र फडणवीस यांची श्रद्धांजली

MP Girish Bapat Passed Away | भाजप खासदार गिरीश बापटांच्या निधनानं राष्ट्रवादीच्या नेत्याला अश्रू अनावर, सांगितल्या जुन्या आठवणी

NCP MLA Jitendra Awhad | जितेंद्र आव्हाड यांच्या बॉडीगार्डची आत्महत्या, ‘त्या’ प्रकरणात होता आरोपी

Congress Mohan Joshi On Pune BJP MP Girish Bapat | विकासाची दृष्टी असलेला नेता हरपला – मोहन जोशी