Radhakrishna Vikhe-Patil On Sanjay Raut | मुख्यमंत्र्यांचा निकाल लावला आता पक्षाचाही लावतील; विखे पाटलांचा संजय राऊतांना खोचक टोला

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Radhakrishna Vikhe-Patil On Sanjay Raut | बंडखोरी केल्यापासून एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि गटाने शिवसेना नेते (Shivsena leader) संजय राऊत यांना लक्ष्य केले आहे. बंडखोरांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या अत्यंत जवळच्या चार-पाच लोकांवर ठपका ठेवला आहे. भाजपा (BJP) आणि मनसे (MNS) देखील राऊत यांच्यावर संधी मिळेल तेव्हा टीका करत असतात. आता भाजपा नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी देखील संजय राऊत यांच्यावर खोचक टीका (Radhakrishna Vikhe-Patil On Sanjay Raut) केली आहे.

 

विखे-पाटील यांनी संजय राऊत यांच्यावर टीका (Radhakrishna Vikhe-Patil On Sanjay Raut) करताना म्हटले आहे की, शिंदे गट (Shinde Group) आणि भाजपावर आरोप-प्रत्यारोप करणारे संजय राऊत हे टीकेचे धनी होत आहेत. असे असले तरी ते आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. गेल्या काही दिवसांपासून बंडखोर आमदारांवर आणि केंद्रीय तपास यंत्रणेवर त्यांनी वेगवेगळे आरोप केले आहेत. मात्र, त्यांच्या अशा विधानाने पक्ष प्रमुखांवर ही वेळ आली, आता ते पक्षाचाही निकाल लावत आहेत.

 

विखे-पाटील यांनी पुढे म्हटले की, मंत्रिमंडळाचा विस्तार (Cabinet Expansion) दिवसेंदिवस लांबत असल्याने विरोधकांकडून सरकारवर टीका होत असली तरी ही टीका विकासकामांसाठी नाहीतर हे सत्ता गेल्याने आलेले वैफल्य आहे. दरम्यान, संजय राऊत यांनी शिवसेना (Shivsena) पक्षमुख उद्धव ठाकरे यांच्या घेतलेल्या मुलाखतीनंतर बंडखोर गट आणि भाजपा नेते आक्रमक झाले आहेत.

दरम्यान, केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांचे पुत्र निलेश राणे (Nilesh Rane)
यांनी सुद्धा उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे.
निलेश राणे यांनी म्हटले आहे की, ठाकरे कुटुंब पैसे देऊन गर्दी गोळा करतं. उद्धव ठाकरे यांनी फुटलेला पेपर सोडवला.
धनुष्यबाण हे चिन्ह आता उद्धव ठाकरे यांना न शोभणारे आहे. गेलेल्या लोकांना गद्दार म्हणून तुम्ही योद्धा होत नाही.
संजय राऊत यांच्यावर बोचरी टीका करताना राणे यांनी म्हटले, संजय राऊत यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे.

 

Web Title :- Radhakrishna Vikhe-Patil On Sanjay Raut | bjp radhakrishna vikhe patil slams shivsena sanjay raut over political situation

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

ASI Bhaskar Modve Passed Away | तपासासाठी गेलेल्या पुणे पोलीस दलातील सहायक पोलीस उपनिरीक्षकावर (ASI) काळाचा घाला

 

Pune Crime | बेहिशेबी मालमत्ता प्रकरणातील आरोपींची 8 वर्षांनी निर्दोष मुक्तता

 

Tata Group | टाटाच्या ‘या’ स्टॉकद्वारे होईल बंपर कमाई ! एक्सपर्टने 540 रुपयांच्या टार्गेट प्राईससह दिले Buy रेटिंग