Radhakrishna Vikhe Patil On Sanjay Raut | ‘संजय राऊत हा सर्वात मोठा दलाल, त्याने आयुष्यभर…’, भाजप मंत्र्याचा हल्लाबोल

संगमनेर/नगर : पोलीसनामा ऑनलाइन – Radhakrishna Vikhe Patil On Sanjay Raut | ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलेल्या आरोपांना प्रत्युत्तर देताना महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी राऊतांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. संजय राऊत हा सर्वात मोठा दलाल आहे. मुंबईतल्या पत्राचाळ घोटाळ्यात मराठी माणसाची फसवणूक करुन कोट्यवधींची माया गोळा केली. कोव्हिडच्या काळात एका बाजूला लोक मृत्यूशी लढत होते, मात्र मेलेल्यांच्या टाळूवरचं लोणी खाण्यात ज्याने धन्यता मानली तो संजय राऊत आहे, अशा शब्दात विखे पाटलांनी संजय राऊतांवर हल्लाबोल केला आहे. (Radhakrishna Vikhe Patil On Sanjay Raut)

राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, माधव गडकरी हे ज्येष्ठ संपादक होते, ते आज हवे होते त्यांन संजय राऊतचं कर्तृत्व कसं आहे हे सांगितलं असते. आपल्या विरोधात लोकांनी ओरड करु नये आणि तक्रार करु नये म्हणून मुंबई उच्च न्यायालयात एका महिलेसंबंधीचं प्रकरण सुरु आहे. असे लोक माझ्यावर जर आरोप करत असतील तर मला काही फरक पडत नाही. आयुष्यभर ज्यांनी दलाली केली त्यांनी दुसऱ्यावर कशाला बोलायचं? अशा लोकांच्या वक्तव्याला प्रसिद्ध मिळते हेच आश्चर्यकारक आहे. हे सगळं माझ्या बदनामीचं षडयंत्र आहे असंही राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलं आहे. (Radhakrishna Vikhe Patil On Sanjay Raut)

संजय राऊत यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर साखर कारखाना प्रकरणात आरोप केले आहेत.
यासंदर्भात विचारलं असता विखे पाटील म्हणाले, संजय राऊत हा सर्वात मोठा दलाल आहे त्याने आयुष्यभर दलालीच
केली आहे. त्याच्या टीकेला कुठे महत्त्व देता? असं विखे पाटील यांनी म्हटलं आहे.
संगमनेरमध्ये त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Smriti Irani To Sonia Gandhi | महिला आरक्षणाचे श्रेय घेण्यावरून काँग्रेस-भाजपामध्ये जुंपली, स्मृती इराणींचे सोनिया गांधीना प्रत्युत्तर