राधाकृष्ण विखे पाटील पुन्हा ‘नए रास्ते की ओर…’, संपर्क कार्यालयावरील पक्षाचा झेंडा ‘गायब’

शिर्डी : पोलीसनामा ऑनलाइन – भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संपर्क कार्यालयावर भाजपचा झेंडा नसल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. श्रीरामपूर येथे काल विखे पाटील यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन झालं. मात्र, कार्यक्रमात कुठेही भाजपचा झेंडा दिसला नाही. एवढेच नाही तर कार्यालयावरून भाजपचा झेंडा गायब होता. त्यामुळे राधाकृष्ण विखे हे ‘नए रास्ते की ओर’ अशी चर्चा सुरु झाली.

महाराष्ट्रात पुन्हा भाजपची सत्ता येणार म्हणून विधानसभा निवडणुकीआधी पक्षांतर करणाऱ्या अनेक नेत्यांची राजकीय कोंडी झाली आहे. राज्यात महाविकास आघाडीचं सरकार हळूहळू स्थिरावत असल्याने हे राजकीय नेते अधिकच अस्वस्थ झाले आहेत. त्यातूनच काही नेत्यांनी परतीच्या प्रवासाची चाचपणी करण्यास सुरुवात केली असून यामध्ये भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील हे नाव यामध्ये अधिक चर्चेत आहे.

विखेंच्या संपर्क कार्यालयाचे काल उद्घाटन करण्यात आले. त्यातच तेथील एका फ्लेक्सवर ‘चलो एक पहल की जाए… नए रास्ते की ओर’ असे वक्तव्य लिहलेले होते. यावरूनच आता राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरु झाल्या आहेत. एकिकडे पक्षातील पराभूत आमदारांनी केलेल्या तक्रारीची चौकशी अद्याप सुरु असतानाच दुसरीकडे मधल्या काळात विखे पुन्हा स्वगृही परतणार असल्याची चर्चा होती. त्यामुळे आता हा नवा रस्ता कोणता अशी चर्चा नगरमध्ये सुरु झाली आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like