Radhakrishna Vikhe Patil | सकाळी बांग देणारा तोही तुरुंगात, अजून किती लोक तुरुंगात जातील? विखे पाटलांची संजय राऊतांचे नाव न घेता टीका

सोलापुर : पोलीसनामा ऑनलाइन – भाजपचे (BJP) ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांची नुकतीच सोलापूर जिल्ह्याच्या पालकमंत्री (Guardian Minister) पदावर नियुक्ती झाली आहे. पालकमंत्री पदी नियुक्ती झाल्यानंतर राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) पहिल्यांदाच सोलापूर दौऱ्यावर आले होते. यावेळी सोलापूरमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत विखे पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारवर (Maha Vikas Aghadi Government) जोरदार हल्लाबोल केला.

 

मागच्या अडीच वर्षात महाविकास आघाडीकडून वसुलीचा कार्यक्रम सुरु होता. संबंधित सरकार महाविकास आघाडी सरकार नसून महावसुली सरकार होतं, अशी टीका राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे. पत्रकार परिषदेमध्ये माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांना देण्यात आलेल्या जामीनाबाबत विचारलं असता, त्यांनी देशमुख यांच्यासह नवाब मलिक (Nawab Malik) आणि संजय राऊतांवर (Sanjay Raut) नाव न घेता टीका केली.

अनिल देशमुखांना उच्च न्यायालयाने (High Court) जामीन मंजूर (Bail Granted) केला आहे.
त्यामुळे त्यावर भाष्य करणं उचित राहणार नाही.
मात्र महाविकास आघाडी सरकार सत्तेत असताना रोज एक मंत्री तुरुंगात गेल्याची बातमी समोर यायची.
आज एक मंत्री तुरुंगात गेला, उद्या दुसऱ्या मंत्र्यांचा नातेवाईकचा अतिरेक्यांशी संबंध आला म्हणून तोही तुरुंगात आणि तिसरा सकाळी नऊ वाजता बांग द्यायचा तोही तुरुंगात गेला आहे.
अजून किती लोकं तुरुंगात जातील? हेही माहीत नाही. महाराष्ट्राच्या राजकारणात नेमकं काय चालू होतं? असा सवाल विखे पाटील यांनी उपस्थित केला.

 

Web Title :- Radhakrishna Vikhe Patil | radhakrishna vikhe patil on sanjay raut in solapur

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune NCP | पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने महागाई बेरोजगारीच्या रावणाचे प्रतिकात्मक दहन

T20 World Cup 2022 | ‘हे’ 4 स्टार खेळाडू टी-20 विश्वचषकातून झाले बाहेर

Pune PMC News | ‘…तोपर्यंत पुणे महापालिकेचे स्वच्छ भारत स्पर्धेतील स्थान खालीच राहाणार विक्रम कुमार, प्रशासक आणि महापालिका आयुक्त