Radhakrishna Vikhe Patil | राज ठाकरेंच्या भविष्यवाणीवर विखे पाटलांची प्रतिक्रिया, म्हणाले…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कधीही निवडणुका लागतील, असे मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) म्हणाले होते. त्यांच्या या विधानावर महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राज्यात भविष्यकारांची संख्या दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. राज्यात वेळोवेळी अनेकजण भाकीत करत असतात, असे राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) म्हणाले.

राज ठाकरे यांनी केलेले विधान नेमके महानगरपालिकासांठी केले होते, की विधानसभेच्या निवडणुकांसाठी केले, हे अद्याप अस्पष्ट आहे. त्यामुळे त्यांच्या विधानाचे तर्क वितर्क लावले जात आहेत. यावर विखे पाटलांना विचारले असता, ते म्हणाले, राज्यात भविष्यकारांची संख्या वाढत चाललेली आहे. राज्यात वेळोवेळी अनेकजण भाकीत करत असतात. पण राज ठाकरे काय बोलले, ते मला माहिती नाही. कोणा कोणाची भविष्यवाणी खरी ठरणार, हे माहित नाही. ते आगामी काळात कळेल. विरोधी पक्षातील काही नेत्यांनी हे सरकार फार काळ टिकणार नाही, असे म्हटले आहे. तसेच नुकतेच जामीनावर बाहेर आलेले शिवसेनेचे (Shivsena) खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) देखील या सरकारच्या टिकण्यावरुन प्रतिक्रिया देत आहेत. त्यांनी देखील राज्यात मध्यावधी निवडणुका लागण्याची शक्यता वर्तविली आहे. त्यामुळे हा वाद वर आला होता.

यावेळी विखे पाटलांनी (Radhakrishna Vikhe Patil) बोलताना विविध मुद्यांना हात घातला. राज्यात लम्पी (LAMPI) आजाराच्या वाढत्या प्रादुर्भावावर विखे पाटील म्हणाले, सुरुवातीला केंद्र सरकारच्या (Central Government) सूचनांचे पालन करून, आपण पाच किलोमीटरपर्यंत लसीकरण करत होतो. मात्र, आता आपल्या राज्याने पुढाकार घेऊन १०० टक्के लसीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच सध्या लम्पीचा उद्रेक छोट्या वासरांमध्ये जास्त दिसून येत आहे. त्यामुळे त्यांचे देखील 100 टक्के लसीकरण करण्यात येणार आहे. आमच्या सरकारने आतापर्यंत 70 टक्के शेतकऱ्यांना मदत केली आहे. आगामी काळात आम्ही सर्व शेतकऱ्यांना मदत करणार आहोत.

तसेच वाळू तस्करांच्या महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांवर हल्ले करण्याच्या घटना अलीकडे वाढल्या आहेत.
त्यामुळे लवकरच गृहमंत्रालयाशी बोलून आम्ही त्यांच्या सुरक्षेत वाढ करणार आहोत.
वाळू माफीयांकडून महसूल विभागांच्या कर्मचाऱ्यांवर होणारे हल्ले आम्ही खपवून घेणार नाही,
असे विखे पाटलांनी यावेळी सांगितले.

Web Title :- Radhakrishna Vikhe Patil | radhakrishna vikhe patil reaction on raj thackeray statement over mid term elections maharashtra

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Jitendra Awhad | ‘तू इथे काय करतेस’ म्हणत त्यांनी मला पुरुषांवर ढकलले; रीदा रशीद यांनी सांगितले गुन्हा दाखल करण्यामागचे कारण

Sajid Khan | “तो माझ्या प्रायव्हेट पार्टकडे ५ मिनिटे पाहत राहिला”, साजिद खानवर ‘या’ अभिनेत्रीने केला गंभीर आरोप