Radhakrishna Vikhe Patil | राधाकृष्ण विखे-पाटील यांचा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना सल्ला

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाईन – Radhakrishna Vikhe Patil | नाशिक पदवीधर मतदारसंघात काल अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी नाट्यमय घडामोडी घडल्या. ऐनवेळी एबी फॉर्म मिळून देखील विद्यमान आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला नाही. आपल्या मुलाला संधी दिल्याचे त्यांनी म्हटले. मात्र या प्रकारावरून राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. सत्ताधारी भाजप पक्षावर काँग्रेस पक्षाकडून आरोप करण्यात येत आहेत. डॉ. सुधीर तांबे यांनी पक्षाशी विश्वासघात केल्याचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले. यावरून राज्याचे महसुल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यावर निशाणा साधला आहे. (Radhakrishna Vikhe Patil)

सत्यजित तांबे यांनी विश्वासघात केल्याच्या नाना पटोले यांच्या आरोपावर राधाकृष्ण विखे-पाटील यांनी जोरदार टीका केली आहे. खरा विश्वासघात कुणी केला हा सवाल नाना पटोले यांनी आधी बाळासाहेब थोरात यांना विचारावा. असा सल्ला त्यांनी नाना पटोले यांना दिला आहे. त्यांनी बाळासाहेब थोरातांना विचारायला पाहिजे की विश्वासघात झाला की नाही ते. की हे सर्वांच्या सहमतीने झाले हे मला माहित नाही. असे राधाकृष्ण विखे-पाटील यावेळी बोलताना म्हणाले. (Radhakrishna Vikhe Patil)

या सर्व प्रकाराला बाळासाहेब थोरात यांचे समर्थन आहे का? आणि यातच नाना पटोले यांना त्यांच्या प्रश्नाचे उत्तर मिळेल की विश्वासघात केला की नाही, असा खोचक टोला देखील यावेळी बोलताना राधाकृष्ण विखे-पाटील यांनी लगावला. तसेच सत्यजीत तांबे यांनी अपक्ष उभं राहण्याचा निर्णय स्वतः घेतला की पक्ष नेतृत्वाला यासंबंधी विचारले होते हे मला माहित नाही. तसेच भाजपने जर सत्यजीत तांबे यांना पाठिंबा देण्याचे ठरवले तर त्यांच्या या निर्णयाचे मी स्वागतच करेन. पक्षात कोणाला घ्यायचे याबाबचा निर्णय पक्षश्रेष्ठी घेत असतात त्याला आमचा विरोध असण्याचे काहीच कारण नाही. असे देखील यावेळी बोलताना महसुलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील म्हणाले.

तसेच काँग्रेस पक्षात कोणते गट आहेत हे मला माहित नाही. मी काँग्रेसमध्ये नसल्याने तेथे काय चालू आहे
याची कल्पना मला नाही. असे विखे-पाटील म्हणाले. तसेच सत्यजीत तांबे हे भाजपमध्ये आले तर
अहमदनगर जिल्ह्यात आमची ताकद वाढेल. भाजप अहमदनगरमध्ये आधीच मजबूत आहे.
पण जर सत्यजीत आले तर संघटन मजबूत करण्यासाठी आम्हाला त्याचा फायदा होईल.
असे देखील राधाकृष्ण विखे-पाटील सोलापूर येथे माध्यमांशी बोलताना म्हणाले.

Web Title :- Radhakrishna Vikhe-Patil | radhakrishna vikhe patil reaction on satyajeet tambe nashik graduate constituency election said nana patole should ask to congress leader balasaheb thorat

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Unauthorized School | ‘त्या’ शाळांवर गुन्हा दाखल करा, जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकाऱ्यांचे आदेश

Pune Crime News | 50 लाखांच्या खंडणीसाठी मुंबईतील 3 बिल्डरचे पुण्यातून अपहरण, गुन्हे शाखेकडून काही तासात सुटका; तिघांना ठोकल्या बेड्या

Gauri Khan | गौरी खान तिच्या लूकमुळे होते वायरल; चाहते करत आहेत कौतुक