Radhakrishna Vikhe Patil | ‘खरे संधीसाधू उद्धव ठाकरे, तेव्हा शिवसैनिक आठवला नाही का?’, राधाकृष्ण विखे पाटलांचे टीकास्त्र

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – भाजपच्या (BJP) व्यासपीठावर साधू संत दिसायचे, आता संधी साधू दिसतात, असे वक्तव्या उद्धव ठाकरे यांनी खेड येथे झालेल्या सभेत केले होते. यावर महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray) टीकास्त्र सोडले आहे. खरे संधीसाधू उद्धव ठाकरे असून ते भाजप सोबत निवडून आले आणि काँग्रेस (Congress), राष्ट्रवादीच्या (NCP) कळपात जाऊन बसले अशा शब्दात राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. ते अहमदनगर येथे एका वृत्तवाहीनीशी बोलत होते.

राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) म्हणाले, खरे संधीसाधू उद्धव ठाकरे आहेत. ते स्वत: भाजपच्या मदतीने निवडून आले आणि काँग्रेस, राष्ट्रवादीच्या कळपात जाऊन बसले. एवढच नाही तर आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनाही त्यांनी आमदार केले. तेव्हा त्यांना शिवसैनिक आठवला नाही का? तेव्हा त्यांनी एका शिवसैनिकाला संधी द्यायला पाहिजे होती. ही संधी देण्याचं धारिष्ट त्यांनी दाखवलं नाही. त्यामुळे मी म्हणजे शिवसैनिक, मी म्हणजे शिवसेना हे सांगणं आता त्यांनी बंद करावं, त्यांनी बाळासाहेबांच्या (Balasaheb Thackeray) विचारांना तिलांजली दिली आहे.

निवडणूक आयोगावर (Election Commission) टिका करताना ‘हा चुना लगाव आयोग’ असल्याचे
उद्धव ठाकरे यांनी म्हटले होते. यावर बोलताना विखे-पाटील म्हणाले, निर्णय तुमच्या बाजूने लागला असता,
तर हाच निवडणूक आयोग तुमच्यासाठी चांगला असता, पण तुमच्या विरोधात निकाल दिल्यामुळे तुम्ही
आयोगाला पक्षपाती म्हणता, असा टोला त्यांनी लगावला. लोकशाही प्रक्रियेत निवडणूक आयोगाचे अनन्य
साधारण महत्त्व आहे. ती एक स्वायत्त संस्था आहे. तिचा सन्मान करायला शिका, असा सल्ला त्यांनी दिला.

Web Title :- Radhakrishna Vikhe Patil | radhakrushna vikhe patil criticized uddhav thackeray on khed rally speech

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Ramdas Kadam On Uddhav Thackeray | ‘…अन्यथा तुम्हाला माझ्या घरी भांडी घासायला यावं लागेल’, रामदास कदमांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात

Deepak Kesarkar | ‘आम्ही सांगत होतो तुम्हीच मुख्यमंत्री राहा, परंतु…’, दीपक केसरकारांचे उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र

MLA Sanjay Shirsat | ‘छत्रपती संभाजीनगर मधून औरंगजेबाची कबर हटवा’, आमदार संजय शिरसाट यांची मागणी