Radhakrishna Vikhe-Patil | 3 हजार 110 तलाठी पदांची भरती प्रक्रिया लवकरच – महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Radhakrishna Vikhe-Patil | तलाठी भरती (Talathi Recruitment) आणि मंडळ अधिकारी पदोन्नती (Mandal Officers Promotion) प्रक्रिया येत्या काही दिवसांमध्ये सुरु करण्यात येणार आहे. 3 हजार 110 तलाठी आणि 518 मंडळ‍ अधिकारी असे एकूण 3 हजार 628 पदे निर्माण करण्यात येणार असल्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे- पाटील (Radhakrishna Vikhe-Patil) यांनी सांगितले.

 

गेल्या काही वर्षांपासून राज्यात तलाठी पदाच्या अनेक जागा रिक्त होत्या. एकाच तलाठ्याकडे अनेक गावे सोपविण्यात आल्याने कामांना विलंब व्हायचा आणि महसूल यंत्रणेवर ताण येत होता. विखे-पाटील (Radhakrishna Vikhe-Patil) यांनी तलाठी भरती आणि मंडळ अधिकारी पदोन्नती प्रक्रियेला गती मिळावी यासाठी पुढाकार घेतला होता.

 

गावात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा तलाठी याच्याशी संबंध येत असतो. सातबारा, विविध दाखले यासाठी नियमितपणे तलाठी यांच्या संपर्कात राहावे लागते.तलाठी हे पद ग्रामीण भागात अत्यंत महत्त्वाचे असते. आता होणाऱ्या तलाठी भरतीमुळे सध्या कार्यरत असलेल्या तलाठी वर्गाचा भार कमी होण्यास मदत होणार आहे. तलाठी साझा पुनर्रचनेनुसार विहित केलेल्या निकषाच्या अनुषंगाने संबंधित विभागीय आयुक्त (Divisional Commissioner) यांच्याकडून महसुल विभाग निहाय प्राप्त माहितीस अनुसरुन वाटप करण्यात आलेल्या 3 हजार 110 साझे आणि 518 महसुल मंडळ कार्यालयासाठी 3 हजार 110 तलाठी भरती आणि 518 मंडळ अधिकारी यांची पदोन्नती असे एकूण 3 हजार 628 पदे निर्मितीला मान्यता देण्यात आली आहे. याबाबतचा शासन निर्णय 7 डिसेंबर 2022 रोजी निर्गमित करण्यात आला आहे.

 

कोणत्या विभागात किती पदं?

पुणे महसुल विभागाअंतर्गत एकूण 602 तलाठी साझे आणि 100 महसुली मंडळे आहेत.
अमरावती महसुल विभागाअंतर्गत एकूण 106 तलाठी साझे आणि 18 महसुल मंडळे आहेत.
नागपूर महसूल विभागाअंतर्गत एकूण 478 तलाठी साझे आणि 80 महसुल मंडळे आहेत.
औरंगाबाद महसुल विभागाअंतर्गत एकूण 685 तलाठी साझे आणि 114 महसुल मंडळे आहेत.
नाशिक महसुल विभागाअंतर्गत एकूण 689 तलाठी साझे आणि 115 महसुल मंडळे आहेत.
कोकण महसुल विभागाअंतर्गत एकूण 550 तलाठी साझे आणि 91 महसुल मंडळे आहेत.

 

Web Title :- Radhakrishna Vikhe-Patil | Recruitment process for 3 thousand 110 Talathi
posts soon – Revenue Minister Radhakrishna Vikhe-Patil

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा