विखेंचं बाळासाहेब थोरातांना थेट ‘आव्हान’, उचललं ‘हे’ पाऊल

शिर्डी : पोलीसनामा ऑनलाईन – काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आणि राधाकृष्ण विखे पाटील यांच्यामधील राजकीय संघर्ष चिघळण्याची चिन्हे आहेत. कारण विखे पाटलांनी बाळासाहेबांचा बालेकिल्ला असणाऱ्या संगमनेरमध्ये स्वतःचे संपर्क कार्यालय सुरु करून त्यांना उघड उघड आव्हानच दिले आहे. पूर्वी काँग्रेमधील एकमेकांचे सहकारी असणारे बाळासाहेब थोरात आणि राधाकृष्ण विखे यांच्यातील सहकारी असतानाचे शीतयुद्ध सर्वसृत होते. आता मात्र विखे पाटील भाजपामध्ये एकत्र गेल्यानंतर त्यांच्यातील राजकीय वर्चस्वाची लढाई खुलेपणाने समोर येत असून शत्रुत्व तीव्र झाल्याचे दिसत आहे.

संगमनेर शहरात सेना-भाजप युतीच्या जनसंपर्क आणि माहिती सुविधा केंद्राचे उद्घाटन आज गृहनिर्माणमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. उदघाटनप्रसंगी विखे यांनी नाव न घेता थोरातंवर टीकाही केली. यावेळी ते म्हणाले,’संगमनेर तालुका टँकर युक्त ठेवण्याचं थोरातांना भूषण असून तालुका दुष्काळग्रस्त कसा राहील हे मॉडेल त्यांनी सांभाळले.’

काँग्रेसने नुकतीच बाळासाहेब थोरात यांची प्रदेशाध्यक्षपदी नेमणूक केली आहे. बाळासाहेब थोरात महाराष्ट्रातील काँग्रेसची परिस्थिती सावरत अशी विरोधकांची अपेक्षा असताना विखे पाटलांनी मात्र त्यांनाच टार्गेट करत त्यांच्या मतदारसंघात संपर्क कार्यालय उघडल्याने राजकीय मोठी चर्चा होत आहे. आता याला बाळासाहेब थोरात कसे उत्तर देणार आणि पुढील घडामोडी काय असतील याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष आहे.

आरोग्यविषयक वृत्त