साईबाबांचे दर्शन घेऊन विखे पाटील मंत्रिपदाची शपथ घेण्यासाठी मुंबईला रवाना

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार उद्या होणार आहे. या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील हे शिर्डी साईबाबांचे दर्शन घेऊन मुंबईला रवाना झाले आहेत. मंत्रिमंडळ समावेशाबाबत त्यांना निरोप आला असून, त्यांचा उद्या शपथविधी होणार असल्याचे सूत्रांकडून समजते.

‘वर्षा’वरून फोन आल्याने विखे-पाटील हे लगबगीने अहमदनगरवरून निघाले. आतापर्यंत मंत्रिमंडळ विस्तारात कुणाला मंत्रिपद मिळेल, याचीच चर्चा सुरू होती. उद्याच्या शपथविधी सोहळ्यानंतरच खातेवाटप होणार आहे. जिल्ह्यात राम शिंदे यांना यापूर्वी कॅबिनेट मंत्रिपद दिले आहे. विखे-पाटील यांच्या रूपाने जिल्ह्याला दुसरे मंत्रीपद मिळणार आहे. विखे यांच्यासोबत नेमके किती आमदार भाजपात प्रवेश करणार, याचा उलगडा होऊ शकला नाही.

विखे पाटील यांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसने विधीमंडळ पक्षनेतेपदी कालच बाळासाहेब थोरात यांची नियुक्ती केली होती. आता विखे-पाटील यांना मंत्रीपद मिळणार आहे. त्यांना नेमके कोणत्या खात्याचे मंत्रीपद मिळणार, याबाबत तर्क-वितर्क लढवले जात आहेत.

सिनेजगत

‘या’ 3 ‘बोल्ड’ अभिनेत्रींनी ‘लव्ह’ मॅरेज केल्यानंतर पतीवर केले लैंगिक अत्याचाराचे गंभीर आरोप

‘या’ ४ ‘टॉप’च्या अभिनेत्रींना ‘सुंदर’ दिसण्यासाठी ‘मेकअप’ची अजिबात नाही गरज

अभिनेत्री प्रियंका चोपडा सलमान खानच्या ‘भारत’ चित्रपटाबाबत मोठं वक्‍तव्य

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी ‘भयंकर’ चिडली, ‘त्या’ प्रियकराबाबत केला मोठा खुलासा