राधाकृष्ण विखे पाटलांना भाजपकडून पाहिजे ‘हे’ महत्वाचे खाते

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – शरीराने काँग्रेसमध्ये मात्र मनाने भाजपमध्ये असलेले राधाकृष्ण विखे पाटील लोकसभा निवडणूक संपल्यानंतर लगेच भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. महसूल आणि सार्वजानिक बांधकाम यातील एका खात्याची जबाबदारी मुख्यमंत्री त्यांच्या खांद्यावर देतील असा जाणकारांचा अंदाज आहे. मात्र विखे यांच्याकडून महसूल किँवा गृह या दोन खात्यांना पसंती दिली जाणार असल्याचे सांगितले जात आहे.

दिवंगत नेते बाळासाहेब विखे पाटील यांच्या जयंती समारंभास उपस्थित राहण्यासाठी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील आज लोणी येथे येत आहेत. त्यामुळे राधाकृष्ण विखे पाटील भाजपमध्ये जाणार आणि मंत्री होणार अशा चर्चा आता रंगू लागल्या आहेत. त्यामुळे आमदारकीचा राजीनामा देऊन विखे पाटील भाजप मध्ये प्रवेश करणार आणि लगेच मंत्रिपदाची शपथ घेणार. अशी शक्यता वर्तविली जात आहे.

…आमदार नसलेला मंत्रिपदाचा सोपा मार्ग !

आचारसंहिता संपल्यानंतर आमदारकीचा राजीनामा देऊन कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली तर विखे हे आमदार नसलेले मंत्री म्हणून मंत्रिमंडळात राहतील. मंत्रिपद स्वीकारल्यानंतर सहा महिन्यांच्या आत आमदार म्हणून निवडून यावे लागते. मात्र तोपर्यंत विधानसभेची मुदत संपेल. निवडणुका जाहीर होतील. त्यामुळे आमदार नसलेला मंत्री होण्याचा सोपा मार्ग ते निवडणार असल्याचे सूत्रांकडून सागण्यात येत आहे.