मलबार हिलमध्ये ‘विक्रमी’ व्यवहार ! तब्बल 1000 कोटी मोजून ‘या’ उद्योगपतीने घेतलं अलिशान ‘महल’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मुंबईतील श्रीमंताचे ठिकाण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मलबार हिलमध्ये रिअल इस्टेटमध्ये विक्रमी व्यवहाराची नोंद झाली आहे. मलबार हिलमध्ये तब्बल 1000 कोटींचा घरखरेदीचा व्यवहार झाला आहे. मुकेश अंबानी यांंच्यानंतर देशातील दुसरे श्रीमंत व्यक्ती आणि D-Mart चे मालक राधाकृष्ण दमानी यांनी हे घर विकत घेतले आहे. सध्या हा व्यवहार रिअल इस्टेट क्षेत्रात चर्चेचा विषय आहे.

बुधवारी (दि. 31 मार्च) हा व्यवहार झाला आहे. दमानी यांनी मलबार हिलमध्ये 1000 कोटींना विकत घेतलेल्या या घरासाठी 30 कोटींची स्टॅम्प ड्युटी भरली आहे. बाजारभावानुसार य़ा घराची किंमत 724 कोटी रुपये आहे. 5725.22 चौरस फुटाचे हे घर आहे.

राधाकृष्ण दमानी हे D-Mart चे मालक असून देशातल्या अनेक लहान- मोठ्या शहरात D-Mart च्या शाखा आहेत. तसेच देशातील श्रीमंतांच्या यादीत दमानी यांचा दुसरा क्रमांक लागतो. दमानी हे प्रसारमाध्यम तसेच सोशल मीडिया या सर्व गोष्टींपासून दूरच असतात. ते शेअर बाजारातही गुंतवणूकदार आहेत. दमानी यांनी 2017 मध्ये त्यांच्या कंपनीची शेअर बाजारात नोंदणी केल्यानंतर दोनच दिवसांत संपत्तीमध्ये 6100 कोटी रूपयांची वाढ झाली होती.