येत्या 15 दिवसात मोठा राजकीय निर्णय घेणार : राधाकृष्ण विखे पाटील 

मुबंई : वृत्तसंस्था – माझी भूमिका स्पष्ट आहे. मी गोंधळलेलो नाही, उलट माझ्यामुळे अनेकजण गोंधळले आहेत. सुजयच्या तिकिटावरून निर्माण झालेला गोंधळ थांबविण्याचा मी प्रयत्न केला मात्र गोंधळ थांबवू शकलो नाही. मात्र आता येत्या १५ दिवसात मोठा राजकीय निर्णय घेणार असल्याचा खुलासा विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला. ते एका वृत्तवाहीनीशी बोलत होते.

विखे पाटील म्हणाले की, मी एकच तत्व डोळ्यासमोर ठेवलं. वेळ हा सर्व गोष्टींवर उपाय आहे. माझी भूमिका नेहमी स्पष्ट राहिली आहे. आपण पक्षाने दलेली जबाबदारी इमानदारीने पार पाडली आहे. सुजयच्या बाबतीत निर्णय करण्याचा प्रश्न आला त्यावेळी पक्षांतर्गत काही गोष्टी घडल्या, ज्यावर मी बोलू इच्छित नाही.

सुजयचा भाजपमध्ये जाण्याचा निर्णय योग्य होता. त्याच्यासाठी पक्षाकडे इलेक्टिव्ह मेरिटवर तिकिट मागितले होते. त्या मतदारसंघात सुजयने काम केलं आहे. म्हणून त्याला आघाडीकडून उमेदवारी मिळणे आवश्यक होते. असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

आता त्यांच्या या खुलाशानंतर नाराज असलेले विखे पाटील आता कोणता निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.