चाहत्यांना ‘भाईजान’ सलमाननं दिली ‘ईदी’, राधेचं पोस्टर शेअर करत केली ‘रिलीज डेट’ची घोषणा

पोलिसनामा ऑनलाईन – बॉलिवूडचे हँडसम हंक अभिनेता सलमान खानचा ‘राधे : योर मोस्ट वाँटेड भाई’ हा चित्रपट रिलीज होणार असल्याने चाहते प्रतीक्षेत होते आणि अखेर सलमानने एक दमदार पोस्टर शेर करून ‘राधे : योर मोस्ट वाँटेड भाई’ चित्रपटची रिलीज तारीख जाहीर केली.

१३ मे २०२१ रोजी रिलीज होईल चित्रपट
सलमान खानने एक पोस्टर शेर केले असून असे म्हंटले आहे की, हा चित्रपट १३ मे २०२१ रोजी प्रदर्शित होईल. सलमान खानाने कॅप्शनमध्ये लिहले आहे – ‘मी ईदचे कमेंन्टमेन्ट केले होते, ईदला येईल, ”क्योंकी एक बार जो मैंने…” या कॅप्शनसोबत सलमानने #RadheOn13thMay #२monthtoradhe हॅशटॅग वापरले आहे.

प्रभू देवा आहेत दिग्दर्शक
सलमान खानच्या चित्रपटांना ऍक्शन, नाटक, करमणूक यांचा संपूर्ण डॉस म्हणतात आणि राधे या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. प्रभू देवा दिग्दर्शित हा ऍक्शन-ड्रामा २०२१ मधील सर्वाधिक प्रलंबित चित्रपटांपैकी एक असून चित्रपटाच्या नवीन पोस्टरने चाहत्यांना अधिक उत्साही केले आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनात फक्त दोन महिने बाकी आहेत.

पोस्टर कसे आहे
जळत असलेले हेलिकॉप्टर आणि रणांगणाच्या पार्श्वभूमीवर सलमान खान दमदार फिजिक सोबत पहिल्यापेक्षा अधिक हॉट दिसत आहे. पोस्टरमध्ये सलमान खानचे सर्व एलिमेंट्स आहेत आणि हा सर्वात मोठा एंटरटेनर असल्याचे सांगितले आहे. चित्रपटाच्या पोश्टरवरून हे स्पष्ट झाले आहे की, राधेमध्ये प्रेक्षकांना कडक ऍक्शन पहायला मिळणार आहे.

प्रेक्षकांसाठी परफेक्ट ईद
चित्रपटाविषयी बोलताना झी स्टुडिओचे सीबीओ शरिक पटेल म्हणाले की, ‘सलमान खान चित्रपटाद्वारे प्रेक्षकांना चित्रपटगृहात परत आणण्यास आम्ही उत्सुक आहोत कारण त्यांचे चित्रपट उस्तवाचे वातावरण निर्माण करतात. हा २०२१ चा सर्वात मोठा चित्रपट असेल आणि प्रेक्षकांचा प्रतिसाद पाहण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत. मला खात्री आहे की, या खडतर वर्षात चाहत्यांसाठी हा आनंदाचा काळ असेल. ‘राधे : योर मोस्ट वाँटेड भाई’ या चित्रपटामुळे सलमानच्या चाहत्यांसाठी आणि सिनेमा प्रेमींसाठी आनंददायी ईद असेल.

पुन्हा होईल हाऊसफुल्ल थेटर
सलमान खान फिल्मच्या प्रवक्त्यांनी सांगितले की, ‘सलमान खान आणि ईद यांचे खास कनेक्शन आहे आणि सलमान खान फिल्ममधे ‘राधे : योर मोस्ट वाँटेड भाई’ या चित्रपटासोबत ही परंपरा चालू ठेवण्यात आम्हाला आनंद होत आहे. ‘आम्ही टाळ्या वाजवून, शिट्या वाजवण्यास आणि हाऊसफूल्लचा युग परत आणण्यास उत्सुक आहोत, आणि याचसाठी सलमान खानचे चित्रपट प्रसिद्ध आहेत.

काय आहे प्रमुख कास्ट
महत्वाचे म्हणजे या चित्रपटात दिशा पाटनी , रणदीप हुडा आणि जॅकी श्रॉफ मुख्य भूमिकेत आहेत. सलमान खान फिल्म्सने झी स्टुडिओच्या सहकार्याने हा चित्रपट सादर केला असून, सलमान खान, सोहेल खान आणि रील लाईफ प्रोडक्शन प्रा. ईदच्या निम्मिताने हा चित्रपट १३ मी २०२१ रोजी प्रदर्शित होईल.